जिओ ४ जी धक्का देण्यासाठी ही कंपनी सुरु करते ५ जी
सार्वजनिक क्षेत्रातील टेलीकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL)ला पूर्ण विश्वास आहे की, त्यांना देशात 4G सर्विस सुरू करण्यासाठी आणि भविष्यात 5G सर्विस सुरु करण्यासाठी 700 मेगाहर्ट्ज बँड एयरवेजचा वापर करण्यासाठी सरकार लवकरच मंजूरी देईल. बीएसएनएलचे चेअरमन अनुपम श्रीवास्तव यांनी म्हटलं की, टेलीकॉम डिपार्टमेंटला 4G सर्विस सुरू करण्यासाठी 700 मेगाहर्ट्ज बँडमध्ये एयरवेज वापरण्यासाठी पत्र लिहिलं आहे.
नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील टेलीकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL)ला पूर्ण विश्वास आहे की, त्यांना देशात 4G सर्विस सुरू करण्यासाठी आणि भविष्यात 5G सर्विस सुरु करण्यासाठी 700 मेगाहर्ट्ज बँड एयरवेजचा वापर करण्यासाठी सरकार लवकरच मंजूरी देईल. बीएसएनएलचे चेअरमन अनुपम श्रीवास्तव यांनी म्हटलं की, टेलीकॉम डिपार्टमेंटला 4G सर्विस सुरू करण्यासाठी 700 मेगाहर्ट्ज बँडमध्ये एयरवेज वापरण्यासाठी पत्र लिहिलं आहे.
श्रीवास्तव यांनी म्हटलं की, 700 मेगाहर्ट्ज बँडमध्ये 5 मेगाहर्ट्चे 6 स्लॉट आधीच उपलब्ध आहे. आम्ही त्यामधला एक स्लॉट बीएसएनएलला देण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटलं की, आम्ही भविष्यात या स्लॉटच्या मदतीने अल्ट्रा-हाई स्पीड 5G सर्विस देखील सुरु करण्याची योजना करत आहोत. यासाठी बीएसएनएल चीनची टेलीकॉम उपकरण बनवणारी कंपनी जेडटीईसोबत करार करणार आहोत. याआधी बीएसएनएलने फिनलँडची कंपनी नोकियासोबत 5G सर्विस देण्यासाठी करार केला आहे.
इतर कंपन्या देखील ५ जी साठी काम करताय. त्यामुळे देशात लवकरच ५ जी सर्विस सुरु होण्याची शक्यता आता वाढली आहे.