नवी दिल्ली : BSNL ने दरवर्षी प्रमाणे यंदाही ईदच्या निमित्ताने 786 रुपयांचा प्रीपेड प्लान लॉन्च केला आहे. बीएसएनएलचा हा प्लान पॅन-इंडियाच्या आधारावर 12 जून 2018 पासून सुरु झाला आहे. या प्लानच्या प्रमोशनच्या आधारावर केवळ 15 दिवसांसाठीच लॉन्च केला आहे. पाहूयात या प्लानमध्ये काय आहे खास...


असा आहे BSNLचा ईद 786 रुपयांचा प्लान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्लान अंतर्गत बीएसएनएल आपल्या ग्राहकांना 300 GB इंटरनेट डेटा देत आहे. या प्लानची वैधता 150 दिवसांची असणार आहे. त्यानुसार ग्राहकांना प्रति दिन 2GB इंटरनेट डेटा मिळणार आहे. यासोबतच अनलिमिटेड वॉईस कॉलिंग कुठल्याही नेटवर्कवर फ्री आहे.



या प्लान अंतर्गत ग्राहक दिल्ली आणि मुंबई सर्कलमध्ये वॉईस कॉल्स करु शकतात. बीएसएनएल सामान्यत: दिल्ली आणि मुंबई सर्कलमध्ये फ्री वॉईस कॉलिंग ऑफर करत नाही. मात्र, या प्लानमध्ये ग्राहकांना कुठल्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगची सुविधा मिळत आहे. वॉईस कॉलिंगच्या सुविधेसह ग्राहकांना 100 SMS प्रति दिन फ्री मिळणार आहेत.


जिओसोबत टक्कर:


BSNL च्या या प्लानला रिलायन्स जिओच्या 1999 रुपयांच्या प्लानची टक्कर मिळणार आहे. जिओच्या या प्लानमध्ये 125 GB इंटरनेट डेटा, अनलिमिटेड वॉईस कॉल्स आणि 100 SMS प्रति दिन मिळतात. या प्लानची वैधता 180 दिवसांची आहे. बीएसएनएलही जिओ प्रमाणेच अनलिमिटेड वॉईस कॉलिंगची सुविधा देत आहे.


यासोबतच बीएसएनएलने FIFA वर्ल्ड कप 2018 डेटा प्लान लॉन्च केला आहे. या प्लानची किंमत 149 रुपयांची असून या प्लानमध्ये ग्राहकांना 4GB डेटा प्रति दिवस मिळतो. या प्लानची वैधता 28 दिवसांची आहे.