BSNL चा धमाका ! आणलाय सर्वात स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लान
आतापर्यंतची सर्वात स्वस्त प्रीपेड योजना
नवी दिल्ली :सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) आतापर्यंतची सर्वात स्वस्त प्रीपेड योजना आणली आहे. बीएसएनएल आजकाल एअरटेल, जिओ आणि पाचव्या खासगी दूरसंचार कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी अनेक योजना आणत आहे. या योजनेमुळे बीएसएनएलने इतर कंपन्यांच्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ही आतापर्यंतची सर्वात स्वस्त प्रीपेड योजना असल्याचा बीएसएनएलचा दावा आहे.
47 रुपयांचा रिचार्ज प्लान
बीएसएनएलने 47 रुपयांचा प्रीपेड रिचार्जचा प्लान आणला. सध्या बाजारात मिळणाऱ्या प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये हा सर्वात स्वस्त प्लान आहे असा कंपनीचा दावा आहे. या योजनेत ग्राहकांना बरेच फायदे दिले जात आहेत.
Keralatelecom च्या वृत्तानुसार,या योजनेंतर्गत ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा गेलीय. याशिवाय यूजर्सना दररोज 100 एसएमएस फ्री मिळतायत यासह नॅशनल रोमिंगची सुविधादेखील पुरविली जात आहे.
मिळतोय 14 जीबी डेटा
या 47 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज योजनेत ग्राहकांना 14 जीबी डेटाही देण्यात येतोय. बीएसएनएलच्या या योजनेची वॅलिडीटी 28 दिवसांची आहे.
या स्वस्त रिचार्ज योजनेत ग्राहकांना मोफत सिमही देण्यात येत आहे. तसेच केवळ नवीन ग्राहकांसाठी विनामूल्य सिम देखील देण्यात येत आहे. बीएसएनएलने ही खास योजना केवळ केरळ टेलिकॉम सर्कलसाठी सुरू केली आहे.
या योजनेचा लाभ 31 मार्चपर्यंत घेता येईल. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ही नवीन योजना सर्कलमध्ये अधिक ग्राहक खेचून आणण्यासाठी आहे. BSNL ऑफीसमध्ये तुम्हाला या प्लानची माहिती मिळू शकेल. हा प्लान ऑनलाईन देखील लॉन्च करण्यात आलाय.