नवी दिल्ली : बीएसएनएल (BSNL)ने प्रीपेड युजर्ससाठी एक नवा आणि स्वस्त प्लान लॉन्च केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिलायन्स जिओने टेलिकॉम सेक्टरमध्ये एन्ट्री करताच डेटा आणि प्राईस वॉर सुरु झालं आहे. जिओला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने यापूर्वी अनेक प्लान्स लॉन्च केले होते. मात्र, आाता बीएसएनएलने एक जबरदस्त प्लान लॉन्च केला आहे. 


नव्या टेरिफ वाऊचर अंतर्गत बीएसएनएलतर्फे अनलिमिटेड वॉईस कॉलिंग आणि नॅशनल रोमिंगची सुविधा देण्यात येत आहे. 


९९ आणि ३१९ रुपयांचा प्लान 


नॅशनल रोमिंगनुसार मिळणारी सुविधा तुम्हाला दिल्ली आणि मुंबईत मिळणार नाही. या प्लानमध्ये कंपनीतर्फे पर्सनलाईज्ड रिंग बँक टोनची सुविधा देण्यात आली आहे. या सुविधेचा फायदा बीएसएनएलच्या ९९ रुपयांच्या प्लानमध्ये घेऊ शकतात. 


यासोबतच BSNL ने ३१९ रुपयांचा वाऊचर ही सादर केली आहे. या प्लामध्ये ९९ रुपयांच्या प्लान सारखेच फायदे आहेत. मात्र, या प्लानची वैधता ९० दिवसांची आहे. मात्र, या प्लानमध्ये पर्सनलाईज्ड रिंग बँक टोनची सुविधेचा फायदा नाहीये.


मॅक्झिमम प्लानमध्ये एक वर्षांचा इंटरनेट डेटा


कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे की, स्पेशल टेरिफ वाऊचर हे केवळ कॉलिंगसाठी आहे. ९९ रुपये आणि ३१९ रुपयांचा रिचार्ज केल्यास ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. मात्र, यामध्ये तुम्हाला इंटरनेट डेटाचा लाभ मिळणार नाही.


यापूर्वी BSNL ने 'मॅक्झिमम प्लान' लॉन्च केला होता. या प्लानमध्ये BSNL च्या प्रीपेड ग्राहकांना ९९९ रुपयांच्या रिचार्जमध्ये ३६५ दिवसांची वैधता आणि १ जीबी डेटा प्रतिदिन मिळतो. 


४० केबीपीएस स्पीड राहणार 


मॅक्झिमम प्लानमध्ये ग्राहकांना १८१ दिवसांपर्यंत अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉल्सचा लाभ मिळणार आहे. बीएसएनएलचा मॅक्झिमम प्लान जम्मू-काश्मीर आणि आसाम वगळता इतर सर्कलमध्ये लागू आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड डेटासोबतच एसएमएस ही देण्यात येत आहेत. एका वर्षाची वैधता असलेल्या या प्लानमध्ये प्रति दिन १ जीबी डेटाचं लिमिट संपताच स्पीड कमी होऊन ४० केबीपीएस होईल.


१८१ दिवसांनंतर होणार बदल


BSNLच्या या प्लानमध्ये १८१ दिवसांपर्यंत अनलिमिटेड कॉलिंगसोबतच डेटा आणि मेसेजचा लाभ मिळणार आहे. १८१ दिवसांनंतर यामध्ये काही बदल होतात. यामध्ये तुम्हाला इंटरनेट डेटाचा लाभ पूर्ण वर्षभर मिळणार आहे. तर वॉईस कॉलिंगमध्ये लोकल, एसटीडी आणि रोमिंगचा लाभ (दिल्ली आणि मुंबई वगळता) सर्वांना मिळणार आहे. दिल्ली आणि मुंबईत वॉईस कॉल ६० पैसे प्रति मिनिट या दराने असणार आहे.