मुंबई : बीएसएनएल (भारत संचार निगम लिमिटेड) रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलला जोरदार टक्कर दिली आहे. जास्त डेटा वापरणाऱ्या यूजर्सना ९८ रुपयांचा प्लान आणला आले. डेटा त्सुनामी असं या प्लानच नाव आहे. बीएसएनएलच्या या स्पेशल टॅरिफ वाऊचर (एसटीवी)ची वॅलिडिटी २६ दिवसांची आहे. या प्लानमध्ये युजर्सना ३९ जीबी डेटा वापरता येणार आहे. सर्कलमध्ये राहणारे युजर्स बीएसएनएलची वेबसाईट किंवा थर्ड पार्टी अॅपच्या मदतीने हा प्लान रिचार्ज करू शकतात. हा प्लान १.५ रुपये दराने १ जीबी डेटा देत आहे. देशातील कोणत्याही टेलिकॉम ऑपरेटर्सपेक्षा स्वस्त आहे. या प्लानमध्ये तुम्हाला एसएमएस आणि अनलिमिटेड कॉल्सची सुविधा मिळणार नाही. या


या प्लानला टक्कर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिलायन्स जिओ च्या ९८ रुपयांच्या प्लानमधअये रोज २ जीबी डेटा मिळतो. यामध्ये ३०० एसएमएस मिळतात. याची वैधता २८ रुपयांची आहे. तर एअरटेलच्या ९९ रुपयांच्या प्लानमध्ये रोज १ जीबी डेटा मिळतो. यामध्ये रोज १०० एसएमएस असून याची वैधता २८ दिवसांची आहे.  


९९ रुपयांत २० Mbps स्पीड 


नॉन -FTTH BSNL प्लान्सची किंमत 99 रुपयांपासून ते 399 रुपयांपर्यंत आहे. यामध्ये ग्राहकांना प्रति महिना 45GB रुपयांपासून प्रति महिना 600 GB पर्यंत डेटा ग्राहकांना मिळणार आहे. टेलिकॉमटॉक ने दिलेल्या वृत्तानुसार, या प्लान्समध्ये ठराविक सिमेपर्यंत युजर्सला 20Mbps चा स्पीड मिळणार आहे आणि याची वैधता संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 1Mbps होईल. या प्लान्समध्ये युजर्सला कुठल्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आणि डेटा मिळणार आहे. तसेच अंदमान आणि निकोबार वगळता देशातील इतर सर्व ग्राहकांसाठी हे प्लान्स असणार आहेत.BSNL BBG कॉम्बो ULD 45GB प्लानची किंमत 99 रुपये ठेवण्यात आली आहे. यामध्ये 1.5GB डेटा मिळणार आहे. त्याचप्रमाणे 150GB च्या प्लानची किंमत 199 रुपये असून यामध्ये ग्राहकांना प्रति दिन 5Gb डेटा मिळणार आहे. 300GB आणि 600GB डेटा प्लानची किंमत क्रमश: 299 रुपये आणि 399 रुपये ठेवण्यात आली आहे. यामध्ये दररोज 10GB आणि 20GB डेटा ग्राहकांना मिळणार आहे. 


या प्लानमध्ये 20Mbps चा स्पीड ग्राहकांना ठराविक मर्यादेपर्यंत दिला जाणार आहे. त्यानंतर हा स्पीड 1Mbps होईल. मिळालेल्या माहितीनुसार, स्पीड मिडनाईट 12am ला रिस्टोअर केला जाईल. ही एक प्रमोशनल ऑफर आहे त्यामुळे केवळ 90 दिवसांसाठीच वैध राहाणार आहे. सहा महिन्यांपर्यंत या प्लान्सचा लाभ घेतल्यानंतर ग्राहक BSNL चे इतर प्लान्स घेऊ शकतात. तसेच रिपोर्ट्सनुसार, नव्या ग्राहकांना 500 रुपये डिपॉझिट करावे लागणार आहेत.