नवी दिल्ली : बीएसएनएल असमने नवनवे प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्स लॉन्च केले आहेत. बीएसएनएल असमच्या टेलिकॉम सर्कलचे चिफ जनरल मॅनेजर संदीप गोविल यांनी युजर्सचा विचार करून मिनी डेटा पॅक, नवे अनलिमिटेड व्हॉईस कॉलच्या व्यतिरिक्त फ्री कॉलिंग आणि डेटा यांचे नवीन प्लॅनस सादर केले आहेत. गोविल यांनी सांगितले की, बीएसएनएलच्या या प्लॅन्समुळे मोबाईल आणि लॅंडलाईन या दोन्ही युजर्सना फायदा मिळेल.


आंतरराष्ट्रीय वायफाय हॉट-स्पॉट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनीने आंतरराष्ट्रीय वायफाय हॉट-स्पॉट लॉन्च केले आहे. याचा फायदा देशाच्या बाहेर प्रवास करत असणाऱ्या युजर्संना मिळेल. ३० दिवसांची व्हॅलिडिटी असलेल्या या प्लॅनची किंमत ५०१ रुपये आहे.


काय आहे प्लॅन्स?


महिन्याच्या सुरुवातील बीएसएनएलच्या पोस्टपेड युजर्सना लक्षात घेऊन नवीन डेटा आणि कॉलिंगचे प्लॅन्स सुरु करण्यात आले. ज्यात युजर्संना ३९९ रुपयांचा ३० जीबी डेटा मिळेल. हा डेटा कॅरिफॉरवर्ड होणार नसला तरी तो वापरण्याची काही मर्यादा नाहीये. याचा अर्थ ३० दिवसांच्या आत कितीही डेटा वापरू शकता.


प्रीपेड युजर्ससाठी रिचार्ज


प्रीपेड युजर्स ४४८ रुपयांच्या रिचार्जवर अनलिमिटेड कॉलिंगसोबत दररोज १ जीबी डेटा ८४ दिवसांसाठी तुम्ही वापरू शकता. बीएसएनएलच्या ४ जी सेवा सध्या केरळच्या काही भागात सुरू करण्यात आली आहे. सध्या बीएसएनएल आणि नोकीया एकत्रितपणे १० भागात ४ जी नेटवर्क वाढवण्याचे काम करत आहेत.