BSNL धमाका: आता रिचार्जवर मिळणार ५०% कॅशबॅक
बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे.
नवी दिल्ली : बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे.
सणासुदीच्या काळात प्रत्येक टेलिकॉम कंपनी ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर्स लॉन्च करत आहेत. रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोननंतर आता बीएसएनएलने एक जबरदस्त ऑफर आणली आहे.
दसऱ्याच्या मुहूर्तावर बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. कंपनीने या ऑफरचं नाव 'विजय दशहरा' असं ठेवलं आहे.
BSNL च्या नव्या ऑफरनुसार, तुम्हाला वॉईस कॉलिंग रिचार्जवर ५० टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. मात्र, यासाठी तुम्हाला बीएसएनएलच्या अॅप किंवा वेबसाईटवरुन रिचार्ज करावं लागणार आहे. ही ऑफर २५ सप्टेंबरपासून संपूर्ण देशभरात लागू केली जाणार आहे. तसेच ही ऑफर एक महिन्यापर्यंत सुरु राहणार आहे.
विजय दशहरा ऑफरमध्ये २५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर दरम्यान कुठलंही रिचार्ज केल्यास तुम्हाला ५० टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे.
कॅशबॅक केवळ ४२, ४४, ६५, ६९, ८८ आणि १२२ रुपयांवर मिळणार आहे. तसेच २५ सप्टेंबरपासून २ ऑक्टोबरपर्यंत केलेल्या ३० रुपयांच्या रिचार्जवर कंपनीतर्फे फुल टॉकटाईम दिला जाणार आहे.