नवी दिल्ली : रिलायन्स जिओने आपले दमदार प्लान्स लॉन्च केल्यानंतर टेलिकॉम सेक्टरमध्ये एक प्रकारचं प्लान्स युद्ध सुरु झाल्याचं पहायला मिळत आहे. या वॉर गेममध्ये आता बीएसएनएल (BSNL) आपली स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.


ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीएसएनएल (BSNL)ने नुकतेच आपल्या ४२९ आणि ४८५ रुपयांच्या प्रसिद्ध प्लान्सची वैधता कमी केली. मात्र, रिलायन्स जिओपेक्षा चांगली सुविधा तसेच ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी बीएसएनएलने आपल्या १८७ रुपयांच्या प्लानमध्ये मोठा बदल केला आहे.


BSNLचा मोठा बदल


बीएसएनएल आता १८७ रुपयांच्या टेरिफ प्लान अंतर्गत ग्राहकांना अनलिमिटेड डेटा ऑफर करत आहे आणि हा एक मोठा बदल असल्याचं बोललं जात आहे.


असा आहे BSNLचा नवा प्लान


या प्लान अंतर्गत कंपनीने आपल्या दिलेल्या सीमेपेक्षा अधिक डेटा युज केल्यास ४०kbpsचा डेटा स्पीड देण्यास सुरुवात केली आहे. २८ दिवसांच्या वैधतेसोबत १GB हाय स्पीड टेडा उपलब्ध करुन देत आहे. यासोबतच अनलिमिटेड वॉईस कॉल्स आणि रोमिंग आऊटगोइंग कॉल्सची सुविधाही मिळत आहे.


रियायन्सचा १४९ रुपयांचा प्लान


रिलायन्स जिओ १४९ रुपयांच्या प्लान्समध्ये अनलिमिटेड डेटा ऑफर करत आहे. यामध्ये लिमिटेड डेटा युसेजनंतर स्पीड कमी होऊन ६४ kbps होते. 


बीएसएनएलने आपल्या प्लानमध्ये केलेल्या बदलामुळे रिलायन्स जिओला एक मोठी टक्कर मिळणार आहे. बीएसएनएलचा ३जी स्पीडही चांगला असतो. रिलायन्स जिओच्या या प्लानची वैधता २८ दिवसांपर्यंत असते.