केवळ ९९९ रुपयांत वर्षभर दररोज एक जीबी डाटा!
रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलनं एक शानदार प्लान सादर केलाय.
मुंबई : रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलनं एक शानदार प्लान सादर केलाय.
बीएसएनएलच्या या प्लान अंतर्गत यूझर्सनं वर्षभर दररोज १ जीबी डाटा मिळणार आहे. बीएसएनएलच्या या प्लानसाठी यूझर्सना वर्षभरासाठी म्हणजेच ३६५ दिवसांसाठी केवळ ९९९ खर्च करावे लागणार आहेत.
दररोज एक जीबी डाटा लिमिट संपल्यानंतर स्पीड कमी होईल. त्यानंतर हा स्पीड ४० केबीपीएस होईल.
बीएसएनएलच्या या प्लानमध्ये युझर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉल्सचीही सुविधा मिळणार आहे. परंतु, ग्राहकांना ही सुविधा केवळ १८१ दिवसांपर्यंतच मिळू शकेल.
बीएसएनएलच्या प्रीपेड ग्राहकांसाठी ही ऑफर आहे. हा प्लान उत्तर-पूर्व, जम्मू-काश्मीर आणि आसाममध्ये लागू नसेल. इतर ठिकाणी ही सुविधा उपलब्ध होऊ शकेल.
बीएसएनएलच्या या प्लानमध्ये व्हॉईस कॉल्स फ्री असतील. परंतु, दिल्ली आणि मुंबई सर्कलला मात्र यातून वगळण्यात आलंय. त्यामुळे, मुंबई आणि दिल्लीकरांना ६० पैसे प्रति मिनिट मोजावे लागतील.