केवळ २९८ रूपयांमध्ये अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग, BSNL देणार Jioला धक्का
रिलायन्स जिओने पदार्पणातच जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे टेलिकॉम क्षेत्रातील मातब्बर कंपन्यांना धक्का बसला. रिलायन्सच्या चौखूर उधळलेल्या वारूला पायबंद घालण्यासाठी मग या कंपन्यांनी कंबर कसली. ग्राहकांवर ऑफर्सचा पाऊस पडला. आता या खासगी कंपन्यांच्या जोडीला BSNL ही सरकारी संस्थाही उतरली आहे. BSNLने एक नवी ऑफर लॉंच केली आहे. जी रिलायन्स जिओला टक्कर देईल.
मुंबई : रिलायन्स जिओने पदार्पणातच जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे टेलिकॉम क्षेत्रातील मातब्बर कंपन्यांना धक्का बसला. रिलायन्सच्या चौखूर उधळलेल्या वारूला पायबंद घालण्यासाठी मग या कंपन्यांनी कंबर कसली. ग्राहकांवर ऑफर्सचा पाऊस पडला. आता या खासगी कंपन्यांच्या जोडीला BSNL ही सरकारी संस्थाही उतरली आहे. BSNLने एक नवी ऑफर लॉंच केली आहे. जी रिलायन्स जिओला टक्कर देईल.
BSNLने लॉंच केलेल्या ऑफरमध्ये ५६ दिवसांसाठी अनलिमिटेड इंटरनेट डेटा आणि व्हाईस कॉल सुविधा देण्यात आली आहे. एफआरसी असे या ऑफरचे नाव आहे. यात ग्राहक कोणत्याही नेटवर्कला अनलिमीटेड लोकल आणि एसटीडी कॉल करू शकतात. तसेच, या ऑफरमध्ये ग्राहकाला प्रतिदिन 1GB हायस्पीड डेटाही मिळणार आहे. हा हायस्पीड डेटा वापरून संपल्यावर तुमचे इंटरनेट तर सुरू राहील. पण त्याचे स्पीड कमी राहील. हे स्पीड कमी होण्याचे प्रमाण 128kbps इतकी राहिल.
दरम्यान, रिलायन्सने काही दिवसांपूर्वीच एका नव्या ऑफरची घोषणा केली होती. यात ऑफर अंतर्गत ग्राहकाला प्रतिदिन 2GB डेटा वापरायला मिळतो. सोबतच अनलिमिटेड कॉलिंगही मिळते. या प्लानला BSNLने ‘BSNL Sixer’असे नाव दिले आहे. तुम्ही जर BSNLचे प्रीपेड ग्राहक असाल तर, तुम्ही ६६६ रूपयांमध्ये प्रतिदिन 2GB डेटा वापरू शकता. तसेच, फ्री कॉलिंग सुविधेचा लाभही घेऊ शकता. या प्लानची वैधता ६० दिवसांसाठी राहिल. तर, BSNL च्या चौका प्लानमध्ये युजर्सला ४४४ रूपयांमध्ये ९० दिवसांसाठी अनलिमिटेड डेटा वापरलायला मिळणार आहे. या प्लानसाठी अट एकच की, युजर्सला 3G स्पिड 4G डेटा मिळेल. या आधी BSNLने ३३३ रूपयांचा प्लान लॉंच केला होता. ज्यात 3GB डेटा मिळतो. ही मर्यादा संपल्यास नेटचे स्पीड 80Kbps राहते.
दरम्यान, BSNLया ऑफर एअरटेलच्या ३४५ रूपयांच्या प्लानला आणि रिलायन्स जिओच्या ३०९ रूपयांच्या प्लानला टक्कर देतील अशी मार्केटमध्ये चर्चा आहे.