BSNL ग्राहकांसाठी गुडन्यूज, विना सिम कोणत्याही नंबर करु शकता कॉल
बीएसएनएल ग्राहक कंपनीच्या विंग्स (Wings)मोबाईल अॅपच्यामाध्यमातून देशात कोणत्याही नंबरवर कॉल करु शकतात.
मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी बीएसएनएल (BSNL)ने देशात पहिली इंटरनेट टेलीफोन सेवा सुरु केली. या सेवेनंतर बीएसएनएल ग्राहक कंपनीच्या विंग्स (Wings)मोबाईल अॅपच्यामाध्यमातून देशात कोणत्याही नंबरवर कॉल करु शकतात. याआधी पहिल्यांदा मोबाईल अॅपवर कॉल करण्याची सुविधा कोणत्याही अॅपवर नाही. आता तुम्ही अॅपच्यामाध्यमातून कोणत्याही फोनवर तुम्ही फोन करु शकता.
बीएसएनएलला होणार फायदा
सध्याच्या स्पर्धात्मक युगात या नव्या सेवेमुळे बाजारात बीएसएनएलच्या हिस्सेदारीत वाढ होईल, असा विश्वास दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी व्यक्त केला. इंटरनेट टेलिफोन सेवा सुरु करण्यासाठी बीएसएनएलच्या व्यवस्थापनाचे मी अभिनंदन करतो, असे सिन्हा म्हणालेत. ही सेवा वापरकर्त्यांना कॉलशिवाय कॉल करण्याची अनुमती देईल. या सेवेचा उपयोग करुन, बीएसएनएलचे ग्राहक देशातील कोणत्याही नेटवर्कवर कॉल करण्यास सक्षम असतील. बीएसएनएल वाय-फाय किंवा कोणत्याही अन्य सेवा ग्राहक इंटरनेटचा वापर करु शकतात.
ही सेवा २५ जुलैपासून सुरु होईल
दूरसंचार विभागाने हा निर्णय घेतला असून दूरसंचार आयोगाने कंपनीने अॅप आधारित कॉल सेवा सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. या सेवेसाठी नोंदणी या आठवड्यात सुरू होईल आणि सेवा २५ जुलै रोजी सक्रिय करणे सुरु होईल. काही प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की या सेवेसाठी दरवर्षी १०९९रुपये द्यावे लागतील. १०९९ रुपये भरल्यानंतर आपण व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल एका वर्षासाठी विनामूल्य करु शकता.