मुंबई : सरकारची टेलीकॉम कंपनी बीएसएनएलनं १ जुलैपासून सगळ्या पोस्टपेड ग्राहकांना ६ पट जास्त इंटरनेट डेटा द्यायचा निर्णय घेतला आहे. प्रायव्हेट टेलीकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी बीएसएनएल हा नवा प्लॅन घेऊन आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीएसएनएलच्या प्लॅन९९ च्या ग्राहकांना २५० एमबी डेटा मिळणार आहे. याआधी या प्लॅनमध्ये इंटरनेट डेटा मिळत नव्हता. तर प्लॅन२२५ मध्ये ग्राहकांना आता २००एमबी ऐवजी १ जीबी डेटा मिळणार आहे. प्लॅन७९९मध्ये ग्राहकांना ३जीबीऐवजी १०जीबी डेटा आणि अनलिमीटेड फ्री कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. बीएसनएलच्या प्रिपेड ग्राहकांसाठीही लवकरच नवीन ऑफर येणार आहेत.