नवी दिल्ली : भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.


या महिन्यापासून ४जी सेवा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीएसएनएल जानेवारी महिन्यापासून आपली ४जी सेवा सुरु करणार आहे. बीएसएनएलने दावा केला आहे की, ४जी एलटीई सेवा सुरु करताच ग्राहकांना सध्याच्या स्थितीपेक्षा अधिक स्पीडने इंटरनेट डेटा मिळणार आहे.


या सर्कलमध्ये सुरु होणार पहिली ४जी सेवा


BSNL चे सीएमडी अनुपम श्रीवास्तव यांनी सांगितले की, सध्या बीएसएनएल ४जी सेवा केरळमध्ये सुरु करत आहे. ४जी एलटीई सेवा देण्यासाठी केरळ हे पहिलं सर्कल असणार आहे. यानंतर ओडिशामध्ये ही सेवा सुरु करु.


या कंपन्यांसोबत टक्कर


केरळ सर्कलमध्ये भारती एअरटेल, वोडाफो आणि जिओ सारख्या टेलिकॉम कंपन्यांचा सामना BSNL ला करावा लागणार आहे. कारण, या सर्व कंपन्या पूर्वीपासूनच केरळमध्ये आपली ४जी सेवा देत आहे.


अतिरिक्त स्पेक्ट्रमची आवश्यकता


बीएसएनएलच्या मते, २१०० मेगाहर्ट्स बँडमध्ये त्यांच्याकडे ५ मेगाहर्ट्स स्पेक्ट्रम आहे आणि हे ४जी सेवा सुरु करण्यासाठी पर्याप्त आहे. मात्र, ४जी सेवेचा विस्तार करण्यासाठी अतिरिक्त स्पेक्ट्रमची आवश्यकता आहे.