BSNLचा ग्राहकांना झटका, एक फेब्रुवारीपासून फ्री कॉलिंग सेवा बंद
भारत संचार निगम लिमिटेडचे तुम्ही ग्राहक आहात? तर मग ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्वाची आहे.
नवी दिल्ली : भारत संचार निगम लिमिटेडचे तुम्ही ग्राहक आहात? तर मग ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्वाची आहे.
फ्री कॉलिंग सेवा बंद करण्याचा निर्णय
BSNLच्या लँडलाईन युजर्ससाठी एक वाईट बातमी आहे. बीएसएनएलने आपल्या लँडलाईन युजर्सला रविवारी मिळणारी फ्री कॉलिंग सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. फ्री कॉलिंगची ही सेवा १ फेब्रुवारीपासून बंद करण्याचा निर्णय बीएसएनएलने घेतला आहे.
एक फेब्रुवारीपासून फ्री सेवा बंद होणार
बीएसएनएलच्या कोलकाता टेलिफोन्स (कालटेल) येथील मुख्य व्यवस्थापक एसपी त्रिपाठी यांनी सांगितले की, बीएसएनएलतर्फे रविवारसाठी देण्यात येणारी फ्री कॉलिंगची सेवा एक फेब्रुवारीपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय संपूर्ण देशभरात लागू होणार आहे. मात्र, आम्ही काही योजना तयार करत आहोत ज्याच्या आधारे ग्राहकांना नुकसान होणार नाही.
BSNLच्या या निर्णयापूर्वी रात्री मिळणाऱ्या फ्री कॉलिंगच्या सेवेत कपात केली होती. बीएसएनएलने २१ ऑगस्ट २०१६ रोजी रात्री मोफत कॉलिंग आणि रविवारी मोफत कॉलिंगची सेवा पुरवण्यास सुरुवात केली होती.
१ रुपयात मिळणार अनलिमिटेड डेटा
रिलायन्स जिओनंतर आता सरकारी कंपनी BSNL स्वस्तात इंटरनेट सेवा पुरवण्यास सज्ज झाली आहे. यामध्ये बीएसएनएलला डाटाविंड ही कंपनी मदत करणार आहे. दोन्ही कंपन्या मिळुन दररोज केवळ एक रुपया शुल्कात अनलिमिटेड इंटरनेट डेटा देण्याचा प्लान बनवत आहेत.