नवी दिल्ली: मोबाईलमध्ये नेटवर्क नसल्याने अनेकांना याचा त्रास होतो. संबधित व्यक्तीला गरजेनुसार कॉल न करता आल्यामुळे त्याची चिडचिड होते. त्यासाठी बीएसएनएलने त्यांच्या ग्राहकांसाठी विंग्स नावाचा ऍप लॉन्च केला आहे. बीएसएनएलच्या ग्राहकांना नेटवर्क नसतानाही वाय-फायच्या मदतीने व्हाइस कॉल करता येणार आहे. त्याचबरोबर युजर्सला व्हिडिओ कॉलिंगही करता येणार आहे. ही सुविधा इंटरनेटच्या माध्यमातून चालवण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील सर्वात पहिली टेलिफोन सर्विस
भारतात इंटरनेट कॉलिंग सेवा प्रदान करणारी बीएसएनएल सर्वात प्रथम कंपनी ठरली आहे. या ऍप्सच्या मदतीने युजर्स देशातील कोणत्याही ठिकाणी कॉल करु शकतात. युजर्सला परदेशात कॉल करायचे असल्यास त्यांना वेगळा पॅक घ्यावे लागणार आहे. विंग्स ऍपचा वापर करण्यासाठी युजर्सला बीएसएनएलच्या वेबसाईटवर स्वत: विषयक माहिती द्यावी लागणार आहे. 


अशा प्रकारे करा रजिस्टर


- गुगल प्ले स्टोअरमधून विंग्स ऍप डाउनलोड करा
- युजर्सला रजिस्ट्रेशन करण्यासाठी युजर्सला त्यांचा फोटो आणि ओळखपत्र द्यावे. 
- ही प्रक्रिया पुर्ण केल्यानंतर युजर्सला विंग्स पिनकोड पाठवण्यात येणार. तो पिनकोड नंबर या ऍपमध्ये भरावे
- विंग्स ऍपचा वापर करण्यासाठी युजर्सला २जी, ३जी, ४जी सेल्युलर नेटवर्क निवडणे गरजेचे आहे. त्याचबरोबर युजर्स वाय-फायचाही वापर करु शकतात.


सर्विस सुरु करण्यासाठी युजर्सला प्ले स्टोअरमधून ऍप डाउनलोड केल्यानंतर १ हजार ९९ रुपये द्यावे लागणार आहे. पैसे दिल्यानंतर एका वर्षापर्यंत ही सेवा ऍक्टिव्हिट होणार आहे. यासोबत युजर्सला एसआयपी डाउनलोड करावा लागणार आहे. त्यानंतर युजर्सला १० अंकी सब्सक्रिप्शन आयडी देण्यात येईल आणि रजिस्टर मेल आयडीवर १६ अंकी पिनकोड पाठवण्यात येणार. हा पिनकोड विंग्स ऍपमध्ये टाकल्यानंतर या सर्विसचा लाभ घेता येणार आहे.