Budget 2023: केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 सादर करण्यात आला आहे. या बजेटमध्ये सरकारने टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्यापासून ते कस्टम ड्युटीमध्ये कपात करण्यापर्यंत अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. याचा फायदा ग्राहकांना मिळणार आहे. सरकारने मोबाईल फोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या पार्ट्सवरील कस्टम ड्युटी कमी केली आहे. यामुळे देशातील फोन निर्मितीला चालना मिळेल. यासोबतच इतरही अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे आता मोबाईल, कॅमेरा लेन्स आणि इलेक्ट्रिक वाहने स्वस्त होणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले,” देशात मोबाईल फोन स्वस्त केले जातील. त्याचप्रमाणे त्यांच्या कॉम्पोनंट्सवरील आयात शुल्कातही सवलत देण्यात येईल. त्याबरोबर एलईडी टीव्ही देखील स्वस्त करण्याची घोषणा केली गेली आहे. याशिवाय इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरल्या जाणार्‍या लिथियम-आयन बॅटरीवरील आयात शुल्क देखील कमी होणार आहे. ज्यामुळे आता देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती देखील स्वस्त होणार आहेत. याशिवाय देशातील सायकलच्या किंमतीही कमी करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. 


वाचा: नवीन कार खरेदी करण्यापूर्वी वाचा ही बातमी, जाणून घ्या ऑटो क्षेत्रासाठी काय तरतुद?


दरम्यान या अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी मोठी घोषणा केली असून सरकारने स्मार्टफोनवरील सीमा शुक्लात कपात केली आहे. तसेच, स्मार्टफोनमध्ये वापरण्यात येणाऱ्या लिथियम बॅटरीच्या सीमा शुल्कातही कपात करण्यात आली आहे. स्मार्टफोनमधील कॅमेरा लेंसच्या सीमा शुक्लात 2.5 टक्क्यांनी कपात केली. तसेच, एलईडी टीव्हीच्या सीमा शुक्लातही 2.5 टक्क्यांनी कपात करण्यात आल्याचं सीतारमण यांनी सांगितलं.