मुंबई : देशभरात नवनवीन स्मार्टफोन दररोज लॉंच होत असतात, त्याचप्रमाणे आता एका देसी मोबाईल ब्रँडने आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन Realme C31 आणि Poco C31 यासारख्या मोठ मोठ्या स्मार्टफोन्सना टक्कर देतोय. त्यामुळे  चला जाणून घेऊया या स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किंमत काय?
लावाने एंट्री लेव्हल सेगमेंटमध्ये आपला लावा ब्लेझ हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या ब्रँडचा फोन फक्त एकाच कॉन्फिगरेशनमध्ये येतो. Lava Blaze च्या 3GB RAM + 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 8,699 रुपये आहे. हा स्मार्टफोन ग्लास ब्लॅक, ग्लास ब्लू, ग्लास ग्रीन आणि ग्लास रेड या चार रंगांमध्ये 
मिळणार आहे.  


'या' साईटवर खरेदी करा 
तुम्ही लावाच्या अधिकृत वेबसाइटवरून तो बुक करू शकता.लावाच्या ई-स्टोअर, फ्लिपकार्ट आणि इतर ऑफलाइन रिटेल स्टोअरमधून स्मार्टफोन खरेदी करता येणार आहेत. या स्मार्टफोनची विक्री 14 जुलैपासून सुरू होणार आहे. प्रीबुकिंग करणाऱ्या पहिल्या 1000 ग्राहकांना कंपनी Lava Probuds 21 मोफत देत आहे.


फिचर्स काय?


  • या स्मार्टफोनमध्ये 6.51-इंचाचा HD+ रिझोल्यूशन IPS डिस्प्ले

  • पंच होल डिझाइन आणि 20:9 चा आस्पेक्ट रेशो 

  • स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio A22 प्रोसेसर

  • हँडसेट 3GB व्हर्च्युअल रॅम, 64GB स्टोरेज, मायक्रो एसडी कार्ड

  • स्मार्टफोनमध्ये 8MP सेल्फी कॅमेरा, 13MP AI ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप

  • स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी