Maruti कारवर बंपर दिवाळी ऑफर, ५५,००० पर्यंत डिस्काउंट
मारुती (Maruti ) कारवर मोठी बंपर ऑफर मिळणार आहे. चक्क ५५,००० रुपयांचे मोठे डिस्काउंट मिळणार आहे.
मुंबई : या दिवाळीच्या सणात (Festive Season) मारुती (Maruti ) कारवर मोठी बंपर ऑफर मिळणार आहे. चक्क ५५,००० रुपयांचे मोठे डिस्काउंट मिळणार आहे. मारुती- सुझुकी (Maruti Suzuki) आपल्या कारवर बंपर डिस्काउंट ऑफर सुरु केली आहे. ऑटो पोर्टल झिगव्हील्समध्ये (Auto Portal Zigwheels ) अहवालात दिलेल्या माहितीनुसार ही ऑफर आहे. अरेना आणि नेक्सा मॉडेलवर (Arena and NEXA) ५५ हजारांचे डिस्काउंट मिळणार आहे. Alto सह Maruti S-Cross या कारचा यात समावेश आहे. अरेना मॉडेल्सवर डिस्काउंट आजपर्यंत आहे. नेक्सा मॉडेलवर डिस्काउंट २० ऑक्टोबरपर्यंत मिळत आहे.
मारुती एस-प्रेसो (Maruti S-Presso)
कॉर्पोरेट डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि कंज्यूमर ऑफर्स मिळून एकूण ४८ हजार रुपयांचे डिस्काउंट मिळत आहे. एस-प्रेसो ३.७० लाख ते ५.१३ लाखादरम्यान उपलब्ध आहे. सीएनजी आणि पेट्रोल दोन्हींसाठी ही ऑफर आहे.
मारुती सेलेरिओ (Maruti Celerio)
सेलेरिओ एक्ससहीत सर्व मॉडेल्सवर डिस्काउंट मिळत आहे. हे डिस्काउंट ५३ हजार रुपये आहे. या कारची किंमत ४.४१ लाखांपासून ५.६८ लाखांपर्यंत आहे.
मारुती वॅगन आर (Maruti Wagon R)
मारुतीची सर्वात मोठी प्रसिद्ध हॅचबॅकवर ४०,००० रुपयांचे सवलत मिळत आहे. डिस्काउंट पेट्रोल आणि सीएनजी दोन्हींसाठी उपलब्ध आहे. या कारची किंमत ४.४५ ते ५.९५ लाखांच्या दरम्यान आहे.
मारुती विटारा ब्रेझा (Maruti Vitara Brezza)
मारुती विटारा ब्रेझावर ४५,००० रुपयांचे डिस्काउंट मिळत आहे. या कारची किंमत ७.३४ लाखांपासून ११.४० लाखांच्या घरात आहे.
मारुती बालेनो (Maruti Baleno)
मारुती बालेनोच्या सर्व व्हॅरिएंट्सवर ३३,००० रुपयांची सवलत मिळत आहे. या गाडीची एक्स शोरूम किंमत ५.६३ लाखापासून सुरु आहे. ८.९६ लाखांपर्यंत किंमत आहे.
मारुती इग्निस (Maruti Ignis)
इग्निसची किंमत ४.८९ लाखांपासून सुरु होते. ती ७.१९ लाखांपर्यंत आहे.
सेकेंड टू टॉप Zeta मॉडेलवर १० हजार रुपयांची कॅश डिस्काउंट मिळत आहे. तर मारुतीच्या बाकी सर्व मॉडेल कारवर ५० हजार रुपयांचे डिस्काउंट मिळत आहे.
मारुती एस-क्रॉस (Maruti S-Cross)
नवीन S-Cross एस-क्रॉसवर मारुतीवर ५५ हजार रुपयांपर्यंत सवलत मिळत आहे. मारुतीची पेट्रोल कार ८.३९ लाखांपासून सुरु होते. १२.३९ लाखांच्या घरात या कारची किंमत आहे.