Flipkart Offer! फक्त 1 रुपयांत मिळवा Google Nest Mini स्पीकर, कसं ते जाणून घ्या
हा परवडणारा आणि बजेट फ्रेंडली स्पीकर तुम्हाला तुमच्या नावावर करुन घ्यायाचा असेल तर....
मुंबई : जेव्हा जेव्हा आपण स्मार्ट स्पीकर्सबद्दल बोलले जाते, तेव्हा सगळ्यात पहिले नाव येते ते, गुगलच्या Google Nest Mini स्पीकरचे. या स्पीकरची किंमत 4 हजार 499 रुपये आहे. त्यामुळे लोकंच्या बजेटच्या बाहेर या स्पीकरची किंमत जात होती. परंतु आता हा स्मार्ट स्पीकर तुमच्या बजेटमध्ये आला आहे, कारण आता या तुम्ही या स्पीकरला फक्त 1 रुपया देऊन विकत घेऊ शकता.
हा परवडणारा आणि बजेट फ्रेंडली स्पीकर तुम्हाला तुमच्या नावावर करुन घ्यायाचा असेल तर, तुम्हाला काही अटी मान्य कराव्या लागतील. त्यानंतरच तुम्ही त्याला 1 रुपयात खरेदी करू शकाल.
तुम्हाला जर एक रुपयामध्ये Google Nest Mini घ्यायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला गुगल Google Pixel 4a स्मार्टफोन खरेदी करावा लागेल.
खरेतर फ्लिपकार्ट Google Pixel 4a स्मार्टफोन विकत घेणात्या ग्राहकांना 1 रुपयात Google Nest Mini खरेदी करण्याची संधी देत आहे. त्याच बरोबर ग्राहकांना या स्मार्टफोनच्या खरेदीवर pixel.getpepped.com वरुन 7 हजार 999 किंमतीचे फोटोग्राफी लेन्स फ्री मिळणार आहे.
म्हणजेच ही तुमच्यासाठी फायद्याची डिल असणार आहे. म्हणजे जरी कोणी नवीन फोन घेण्याच्या विचारात असेल, त्याने Google Pixel 4a फोन विकत घेतला. तर तो या डिलचा चांगलाच फायदा घेऊ शकतो.
Google Pixel 4a किंमत आणि ऑफर
फ्लिपकार्टवर हा फोन 31 हजार 999 रुपयांना विकला जात आहे. जर तुम्ही हा फोन येस बँक क्रेडिट कार्डसह ईएमआय वर विकत घेतलात, तर तुम्हाला त्वरित 7% डिस्काउंट मिळेल.
याशिवाय ICICI Bank,IndusInd Bank,SBI Cards आणि Mobikwik द्वारे यांनी जारी केलेल्या Amex Network Cards च्या पहिल्या ट्रांजॅक्शनवर 20 टक्के डिस्काऊंट मिळेल.
याशिवाय तुम्ही दरमहा 5 हजार 334 रुपये पासून सुरू होणार्या नो-कॉस्ट ईएमआय या पर्यायाचा देखील फायदा घेऊ शकता.
Google Pixel 4a चे वैशिष्ट्ये
हा स्मार्टफोन 6GB RAM आणि 128GB स्टोरेजच्या एका वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. आपण ते फक्त काळ्या रंगात खरेदी करू शकता.
त्याच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, त्याला 5.81 इंचाचा फुल HD+ OLED डिस्प्ले आहे. यात Qualcomm Snapdragon 730G Processor आहे. तयेच हा 10 ऑपरेटींग सिस्टीवर काम करतो. ज्याला अँड्रॉइड 11 मध्ये अपग्रेड केले जाऊ शकते.
फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये 12.2 मेगापिक्सलचा रीअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
यामध्ये 3.140mAh बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. कनेक्टिव्हिटीच्या इतर वैशिष्ट्यांविषयी सांगायचे झाले, तर यात 4G VoLTE, ब्लूटूथ 5.0, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक आहे.