मुंबई : जर तुमची उद्योगधंद्यात पुढे जाण्याची इच्छा असेल, तर थोडंस भांडवल गुंतवून तुम्हाला महिन्याला लाखोंची कमाई करण्याची संधी आहे. डेअरी प्रॉडक्टसमध्ये अमूल या ब्रॅण्डचं नाव मोठं आहे. अमूलची फ्रंचायझी घेणे, तुमच्यासाठी फायद्याचा सौदा ठरू शकतो. अमूल हा मोठा ब्रॅण्ड असला, तरी अमूलची फ्रंचायझी घेणं खूप सोपं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमूल कोणत्याही रॉयल्टी शिवाय, तसेत प्रॉफिट शेअरिंगशिवाय फ्रेंचायझी ऑफर करत आहे. एवढंच नाही, अमूलची फ्रंचायझी घेण्याचा खर्च देखील जास्त नाहीय. तुम्ही २ लाख ते ६ लाख रूपये खर्च करून चांगलं प्रॉफिट कमवू शकतात.


किती गुंतवणूक होणार


अमूल २ प्रकारची फ्रेंचायझी ऑफर करणार आहे. जर तुम्ही अमूल आऊटलेट, अमूल रेल्वे पार्लर, किंवा अमूल क्योस्कची फ्रेंचायझी घेऊ इच्छीत असाल, तर यात जवळजवळ २ लाखाची गुंतवणूक करावी लागणार आहे. यात नॉन रिफंडेबल पण बॉन्ड सिक्युरिटीसाठी २५ हजार रूपये, तसेच, रिनोव्हेशनसाठी १ लाख रूपये, इक्वीपमेंटसाठी ७५ हजार रूपये खर्च येतो. याची अधिक माहिती तुम्हाला फ्रेचायझी पेजवर मिळेल.


किती होईल कमाई


अमूलने पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार, फ्रेंचायझीमधून जवळ-जवळ ५ ते १० लाखांची विक्री होऊ शकते. परंतू ही विक्री किती होईल, हे तुमची जागा कोणत्या ठिकाणी यावर अवलंबून आहे.  अमूलच आऊटलेट घेतलं तर कंपनी प्रॉडक्टसवर कमीत कमी विक्रीची किंमत घेते, म्हणजे, एमआरपीवर कमिशन मिळतं. यात एका मिल्क पाऊचवर २.५ टक्के, मिल्क प्रॉडक्टसवर १० टक्के आणि आईस्क्रीमवर २० टक्के कमिशन मिळतं.


अमूल आईस्क्रीम स्कूपिंग पार्लरची फ्रेंचायझी घेतली तर रेसिपी बेस्ड आईस्क्रीमवर, शेक, पिझ्झा, सॅण्डविच, हॉट चॉकलेट ड्रिंकवर ५० टक्के कमिशन मिळतं, तसेच प्री पॅक्ड आईस्क्रीमवर २० टक्के आणि अमूल प्रॉडक्टसवर कंपनी १० टक्के कमिशन देते.


फ्रेचायझी घेण्यावर अट काय?


जर तुम्हाला अमूल आऊटलेट घ्यायचं असेल, तर जवळ-जवळ १५० फूट जागा हवी. जर एवढी जागा असेल तर अमूल तुम्हाला फ्रेचायझी देणार. तसेच अमूल आईस्क्रीम फ्रेंचायझीसाठी कमीत कमी ३०० स्क्वेअर फूट जागा असली पाहिजे. यापेक्षा कमी जागा असल्यास अमूल फ्रेंचायझी ऑफर करणार नाही.


अमूलकडून असा आधार मिळेल


अमूलकडून तुम्हाला एलईडी साईनेज दिले जातील, तसेच इक्विपमेंट आणि ब्रॅण्डिंगवर सब्सिडी दिली जाईल. याशिवाय, इनोग्रेशन सपोर्ट दिला जाईल आणि अतिरिक्त खरेदीवर सूट देखील दिली जाईल. ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर दिले जातील. पार्लर बॉय आणि मालकाला ट्रेनिंग देखील दिलं जाईल. तुमच्या पर्यंत माल पोहोचवण्याची जबाबदारी अमूलची असेल. अमूलकडून प्रत्येक मोठ्या शहरात होलसेल डिलर्स नेमले गेलेले आहेत. हे होलसेल डिलर्स फ्रेचायझीपर्यंत माल पोहोचवतात.


येथे घ्या संपूर्ण माहिती


जर तुम्हाला अमूलची फ्रेंचायझी हवी असेल तर येथे आपली मागणी नोंदवा, तुम्ही retail@amul.coop यावर ईमेल करा, ही निवड प्रक्रिया कशी असेल हे समजून घेण्यासाठी अमूलच्या ही लिंक आहे. http://amul.com/m/amul-scooping-parlours