Honda Bikes: भारतात सर्वाधिक मागणी ही दुचाकींना आहे. हिरो, होंडा, टीव्हीएस, बजाज आणि यामाहा अशा अनेक कंपन्या बाजारात आहेत. भारतात 'होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया' (Honda) ही दुसऱ्या क्रमाकांची लोकप्रिय कंपनी आहे. कंपनीनं दिवाळी निमित्त ग्राहकांना खास ऑफर (Diwali Offer) दिली आहे. झिरो डाउन पेमेंट आणि नो कॉस्ट ईएमआय स्कूटर आणि बाइक खरेदी करू शकता. यासाठी ग्राहकांना कोणतेही शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. ही ऑफर 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत असणार आहे. या योजनेचा लाभ सर्व मॉडेल्सवर असणार आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

होंडाने मोटरसायकल आणि स्कूटरवर कॅशबॅक ऑफर दिली आहे. 50 हजार रुपयांच्या ट्रान्सक्शनवर 5 हजार रुपये कॅशबॅक ऑफर मिळेल. आयडीएफसी First Bank Credit Card वरून ईएमआयचा लाभ घेता येईल. या व्यतिरिक्त स्टँडर्ड चार्टर्ड बँक, फेडरल बँक आणि बँक ऑफ बरोडाच्या ग्राहकांना कॅशबॅक ऑफर मिळणार आहे. ऑफरमध्ये Zero Down Payment आणि No Cost EMI असल्याचं स्पष्ट दिलं आहे. असं असलं तरी सर्वकाही फायनान्स कंपनीवर अवलंबून आहे.


Electric Car घेणं खिशाला परवडणार! Tata Tiago पेक्षा स्वस्त गाडी येणार बाजारात


होंडाच्या दुचाकींना भारतात मोठी मागणी आहे. सप्टेंबर 2022 मध्ये कंपनीने एकूण 5.18 लाख दुचाकींची विक्री केली. गेल्या वर्षी 2021 मध्ये 4.88 लाख दुचाकींची विक्री केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 7.6 टक्क्यांची वाढ झाली आहे.