लोनसाठी Mobile loan अॅप्सचा वापर करणं म्हणजे संकटांना निमंत्रण देणं...
तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरती नुसतं कॅश किंवा लोन टाकलंत, तरी देखील तुम्हाला अनेक असे अॅप्स सजेशन दिसतील.
मुंबई : आपल्यापैकी असे अनेक लोक आहेत, जे छोट्या मोठ्या रकमेसाठी कर्ज घेतात. परंतु बॅकेतून एक दोन हजार रुपयांच्या कर्जासाठी देखील बरीच प्रोसिजर असते. तसेच याला वेळ देखील लागतो. परंतु आता बाजारात असे बरेच अॅप्स लाँच झाले आहेत, जे आपल्याला कामी कालावधीसाठी आणि कमी पैशांसाठी लोन देतात. शिवाय या लोन अॅपसाठी जास्त डॉक्यूमेंट्सची गरज भासत नाही. तसेच अगदी काही तासातच लोकांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे येतात. ज्यामुळे बरेचसे लोक या अॅप्सचा वापर करतात. परंतु तुम्हाला माहितीय का, की याच गोष्टीचा फायदा घेत काही फ्रॉड कंपन्या देखील बाजारात उतरल्या आहेत.
हो हे खरं आहे तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरती नुसतं कॅश किंवा लोन टाकलंत, तरी देखील तुम्हाला अनेक असे अॅप्स सजेशन दिसतील. परंतु त्यांपैकी सगळेच अॅप हे खरे असतीलच असे नाही.
खरंतर या संदर्भात एक प्रकरण समोक आलं आहे. ज्यामुळे हे प्रकरण किती गंभीर आहे, हे तुमच्या लक्षात येईल.
खरंतर या लोनच्या नादात संदीप नावाच्या एका तरुणाने आत्महत्या केली आहे. खरंतर संदीपने एक अॅप फक्त फोनमध्ये डाऊलोड केलं होतं, परंतु त्याने त्यातून कोणतंही कर्ज घेतलं नव्हतं. परंतु तरी देखील त्याला कर्जाचा हफ्ता भरण्यासाठी सांगण्यात आलं.
एवढंच नाही जेव्हा संदीप आपण कर्ज घेतलं नाही आणि हफ्ता देखील भरणार नाही असं म्हणाला तेव्हा या अॅपने संदीपचे काही फोटो मॉर्फ करुन संदीपच्या ऑफिसच्या मित्रांना पाठवले. ज्यामुळे शर्मेनं संदीपनं आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.
खरंतर हे अॅप डाऊनलोड झाल्यानंतर आपल्या फोनचे सगळे एक्सेस घेतात. ज्यामुळे तुमच्या फोनमधील कॉन्टॅक्ट, फोटो आणि इतर माहिती या अॅपपर्यंत पोहोचते.
तसेच असे काही मोबाईल अॅप आहेत, जे आपल्याला टॅक्स किंवा सर्विस फीच्या नावाने जास्त पैसे कापतात आणि यांच्याकडून अव्वाच्या सव्वा व्याज लावण्यात येतं. ज्यामुळे अनेकांना हे पैसे त्वरीत भरणे देखील शक्य होत नाही. सामान्यतः गरीब कुटुंबातील लोकांकडून ह्याचा वापर अधिक वापर होतो.
त्यामुळे तुम्ही देखील अशा काही मोबाईल लोन अॅपचा वापर करत असाल तर तो आताच थांबवा.
पोलिस सुत्रांच्या माहितीनुसार, आरोपी बनावट बॅंक खाती आणि मोबाइल फोन वापरतात. पोलिस तपास करायला गेले की हे आरोपी जंगलाकडे पळ काढत असल्यानं देखील अडचणी निर्माण होतात. जंगलातून कार्यरत असल्यानं त्यांचा शोध घेणं कठिण होतं. पोलिस तपासात आरोपी हे राजस्थान आणि हरियाणातून कार्यरत असल्याचं देखील समोर आलंय.