नवी दिल्ली : देशभरातील लष्करी छावण्यांमध्येही यापुढे मोबाईल टॉवर लागलेले दिसणार आहेत. केंद्रीय कॅबिनेटने झालेल्या बैठकीत नुकताच हा निर्णय घेतला. केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या इंडिया मोबाईल कॉंग्रेसमध्ये प्रसाद बोलत होते. प्रसाद म्हणाले, देशात डिजिटल क्रांती पूर्ण करण्यासाठी आणि मोबाईल कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत बनविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अधिक माहिती देताना प्रसाद म्हणाले, गेले अनेक दिवस दूरसंचार कंपन्यांकडून तक्रार केली जात होती की, लष्करी छावनीजवळ मोबाईल टॉवर लावण्यासाठी कुठेच योग्य ठिकाण मिळत नाही. मोबाईल टॉवर जवळ नसल्यामुळे मोबाईलचे नेटवर्क कमजोर होते. त्यामुळे कॉल ड्रॉपच्या समस्या वाढतात. दूरसंचार कंपन्यांच्या विनंती आणि तक्रारीची दखल घेत सरकारने हा निर्णय घेतला आहे.


दरम्यान,  सरकारने काही दविसांपूर्वीच सरकारी कार्यालयांवरही मोबाईल टॉवर लावण्यास मान्यता दिली आहे. जेनेकरून कनेक्टिव्हिटी वाढेल.