Car Crash Video: भारतातील रस्ते सुरक्षेचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात रस्ते अपघात होतात. रस्ता अपघाताच्या (Road Accident) बातम्या पाहिल्या असतील. टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांच्या कार अपघात मृत्यूनंतर सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही दिवसागणिक वाढत असल्याचे दिसून येत आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार, 2021 मध्ये संपूर्ण भारतात 1.55 लाखांहून अधिक लोक रस्ते अपघातात मृत्यू पावले. म्हणजेच, दररोज सरासरी 426 लोक किंवा दर तासाला 18 लोकांचा मृत्यू झाला. यावरुन देशात किती मोठ्या प्रमाणात रस्ते अपघात होत आहेत हे लक्षात येते. नुकताच एक्स्प्रेस वेवर तीन कार एकमेकांना धडकल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. 


या अपघातात टाटा टियागो, एमजी झेडएस ईव्ही आणि टोयोटा इनोव्हा या तीन कारचा समावेश आहे. व्हिडिओ पाहून, तुम्हाला या गाड्यांच्या अंगभूत गुणवत्तेची म्हणजे ताकद अर्थात मजबूतपणा किंवा कमकुवतपणाची कल्पना तर येईलच, पण गाडी चालवताना वाहनांमधील अंतर राखणे किती महत्त्वाचे आहे, याचे महत्त्वही समजेल. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, समोरील एमजी झेडएस ईव्हीने काही कारणास्तव अचानक ब्रेक लावला. त्यामुळे मागून येणारी टोयोटा इनोव्हा झेडएस ईव्हीला धडकली. यानंतर टोयोटा इनोव्हाच्या मागून येणाऱ्या टाटा टियागो हॅचबॅकचा चालक अचानक पूर्ण ब्रेक लावू शकला नाही आणि टाटा टियागोही इनोव्हाला धडकली. 


हा व्हिडीओ अपघातानंतरचा आहे, ज्यामध्ये तिन्ही वाहनांचे नुकसान झालेले दिसत आहे. परंतु, येथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की व्हिडिओ पाहिल्यानंतर, कळून चुकते की, टाटा टियागोला सर्वात जास्त नुकसान झाले आहे तर MG ZS EV ला सर्वात कमी नुकसान झाले आहे. 



मात्र, याचे एक कारण MG अग्रभागी असणे आणि Tiago मागे असणे हे असू शकते. याशिवाय इतर अनेक कारणेही अशा अपघातांमध्ये कमी-अधिक प्रमाणात होणाऱ्या नुकसानामागे असू शकतात.


एस अपघाताचे कारण एमजी झेडएसच्या पुढे धावणारी होंडा जॅझ कार असल्याचे सांगितले जात आहे. तिचा आधी ब्रेक लावला होता. मात्र, महामार्गावर गाडी चालवताना पुढील गाडीपासून योग्य अंतर ठेवणे केव्हाही फायदेशीर ठरते.