मुंबई : हिवाळ्यात (Winter) आपण शरीराची (Body) निगा राखतो. आरोग्याची (Health) काळजी घेतो. त्यानुसार आपल्या कारचीही (Car Tips) काळजी घेणं महत्त्वाचं असतं. वातावरणातील गारव्यामुळे गाडीच्या इंजिनपासून ते बॅटरीपर्यंतच प्रत्येक गोष्टीवर परिणाम होतो. त्यामुळे कार सुरु करण्यापासून ड्राईव्ह करण्यापर्यंत अनेक बाबी ध्यानात ठेवाव्या लागतात. जर तुम्हीपण कारमध्ये बसल्या बसल्या कार सुरु करत असाल, तर तुम्ही मोठं नुकसान करताय. (car tips this tips follow in winter before drived) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिवाळ्यात कारलाही वॉर्मअपची गरज असते. हिवाळ्यात कार तशीच पडून राहिल्याने अनेकदा बॅटरी थंड पडते. त्यामुळे कारच्या इंजिनचं नुकसान होण्याची भीती असते. त्यामुळे कार सुरु केल्यानंतर नक्की काय करायला हवं हे आपण जाणून घेऊयात.  


कार सुरु केल्यानंतर डॅशबोर्डवरील अनेक डिस्प्ले आणि सिंबल्स सुरु होता.  कार सुरु झाल्यानंतर सर्व फीचर्स स्कॅन करते.  त्यानंतर 10-15 सेकंदानंतर सर्व सिंबल्स ब्लिंक होणं बंद होतं. या सर्व क्रियेदरम्यान कार स्टार्ट करु नका.  


हिवाळ्यात कार सुरु केल्यानंतर किमान 30 सेकंद कार जागेवरच राहु द्यात. ताबडतोब कार सुरु केल्यास इंजिनवर भार पडण्याची शक्यता असते. 


कार सुरु केल्या केल्या गाडी वेगात पळवू नका. काही वेळ गाडीचा वेग कमीच ठेवा. हिवाळ्यात  पेट्रोल इंजिनमध्ये उष्णता ठेवण्यासाठी डीझेल 911 इंधन वापरण्याचा सल्ला दिला जातो.