दिवाळीत कार घ्यायचा विचार करताय; 6 लाखांत मिळणाऱ्या बेस्ट SUV आणि Hatchback
Best Family Cars Under 6 Lakhs: या दिवाळीत घरी आणा नवीकोरी कार तेही तुमच्या बजेटमध्ये. स्वस्त पण मस्त असलेल्या कारची माहिती घेऊया.
Best Family Cars Under 6 Lakh: कार घेण्याचे स्वप्न प्रत्येक मध्यमवर्गीयाचे असते. आपली आयुष्यभराची पुंजी खर्च करत मध्यमवर्गीय कार घेतात. या दिवाळीत तुम्ही देखील कार घेण्याचा विचार करताय पण तुमचे बजेट कमी आहे तर आम्ही तुमच्यासाठी काही स्वस्त कारचे पर्याय आणले आहेत. तुमचे बजेट 6 ते 7 लाखापर्यंतचे असेल तर स्वस्त आणि मस्त कारचे पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये मारुती सुझुकीच्या एन्ट्री लेव्हल हॅचबँक ऑल्टोसोबतच व्हॅगनआर, सिलेरियो, ईको आणि स्विफ्टसारख्या हॅचबॅकचा पर्याय आहे. त्याचबरोबर टाटा पंच, हुंडई एक्सटर आणि निसान मेग्नाइटसारखी एसयुव्हीदेखील आहे. ग्राहकांसाठई बेस्ट कार कोणत्या हे जाणून घेऊया. (Best And Affordable Family Cars)
मारुती सुझुकी ऑल्टोके 10
मारुती सुझुकी कंपनीचे ऑल्टो के 10 कारची एक्स शोरुम किमंत 3.99 लाखांपासून सुरू होते. याच्या टॉप व्हेरियंटची किंमत 5.96 लाख रुपये इतकी आहे. स्वस्त कार खरेदी करणाऱ्यांसाठी ऑल्टो के 10 सगळ्यात चांगला पर्याय आहे.
मारुती सुझुकी व्हॅगनर
मारुती सुझुकीच्या कार या देशातील सगळ्यात जास्त विक्री होणारी कार आहे. व्हॅगनआरची एक्स शोरुम प्राइज 5.45 लाख रुपयांपासून सुरू होते.
मारुती सुझुकी ईको
मारुती सुझुकी ईको व्हॅनची एक्स प्राइज 5.27 लाख रुपयांपासून सुरू होते. ही सर्वात जास्त विक्री होणारी कार आहे.
Celerio Maruti Suzuki
Celerio, Maruti Suzuki ची सर्वाधिक मायलेज देणारी कारची एक्स-शोरूम किंमत 5.37 लाख रुपयांपासून सुरू होते. ही हॅचबॅक सीएनजी ऑप्शनमध्येही आहे.
मारुती सुझुकी एस-प्रेसो
मारुती सुझुकीची दुसरी सर्वात स्वस्त कार S-Presso ची एक्स-शोरूम किंमत 4.26 लाख ते 6.12 लाख रुपये आहे.
रेनॉल्ट क्विड
Renault च्या सर्वात स्वस्त हॅचबॅक Kwid ची एक्स-शोरूम किंमत 4.70 लाख रुपयांपासून सुरू होते तर 6.45 लाखांपर्यंत जाते.