नवी दिल्ली : नवीन वर्ष येत असल्याने कार कंपन्या त्यांचा जुना स्टॉक संपवण्याचे मागे लागल्या आहेत. अशात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ते वेगवेगळ्या ऑफर्सही देत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या बाजारात वेगवेगळ्या ऑफर्स सुरू आहेत. जर तुम्हीही कार खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. नवीन वर्षानिमित्त कंपन्या अनेक डिस्काऊंट ऑफर देत आहेत. अशात तुम्ही १ लाख रुपयांचं डाऊन पेमेंट करून ५ हजार रूपयांपेक्षा कमी EMI असलेली कार खरेदी करू शकता.


रेनो क्विड



रेनो क्विड (Renault Kwid) ची दिल्लीच्या एक्स शोरूममधील किंमत २.६२ लाख रूपये आहे. जर तुम्ही ही कार खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर ८० हजार रूपयांचं डाऊन पेमेंट करून बाकीची रक्कम EMI ने द्यावी लागेल. जर तुम्ही शिल्लक राहिलेल्या रकमेची ७ वर्षांची EMI केली तर तुम्हाला प्रत्येक महिन्यात २,९९९ रूपये भरावे लागतील.


मारूती अल्टो ८००



मारूती अल्टो ८०० च्या बेस व्हेरिएंटची किंमत दिल्लीमध्ये २.४६ लाख रूपये आहे. या कारच्या VXI व्हेरिएंटची किंमत ३.२५ लाख रूपये आहे. ही कार तुम्ही १ लाख रूपयांच्या डाऊन पेमेंटवर घेऊ शकता. जर तुम्ही एक लाख रूपयांचं डाऊन पेमेंट केलं तर ५ वर्षांच्या EMI मध्ये तुम्हाला दर महिन्याला ४,७१९ रूपये द्यावे लागतील. 


ह्युंदाई ईऑन



दिल्लीत ह्युंदाई इऑनची एक्स शोरूम किंमत ३.२९ लाख रूपये आहे. ही कारही १ लाख रुपयांचं डाऊन पेमेंट करून तुम्ही घेऊ शकता. प्रत्येक महिन्यात EMI म्हणून ४,६७७ रूपये भरावे लागतील. यानुसार ६० महिन्यांच्या EMI मध्ये तुम्ही ३.८० लाख रूपये पे करू शकता.


टाटा टियागो



टाटा टियागो या कारची किंमत ३.२४ लाख रूपये आहे. ही कारही १ लाख रूपयांच्या डाऊन पेमेंटवर घेऊ शकता. नंतर प्रत्येक महिन्यात तुम्हाला ४,६७७ रूपयांची EMI द्यावी लागेल. एसबीआयने या कारवर ९.२५ टक्के लोक ऑफर केली आहे. 


दॅटसन रेडि-गो



लहान कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही कारही तुम्ही १ लाख रूपयांचं डाऊन पेमेंट करून घेऊ शकता. या कारची एक्स शोरूम किंमत २.४१ लाख रूपये आहे. हा कारची EMI ३,१४१ रूपये पडू शकते. ही EMI तुम्हाला ६० महिने भरावी लागेल.