iPhone 15 Pro : Apple च्या विविध उपकरणांविषयी टेकप्रेमींमध्ये कायमच कमालीचं कुतूहल पाहायला मिळतं. अनेकदा  हे प्रोडक्ट खिशाला परवडले नाहीत तरीही किमान ते पाहून तरी हौस भागवणारी बरीच मंडळी आहेत. हीच मंडळी आता एका भन्नाट आयफोनच्या प्रेमात पडली आहेत. या आयफोनची किंमत इतकी जास्त आहे, की आपल्या कार किंवा घराचं डाऊनपेमेंट भरून होईल असाच विचार एखाद्याच्या मनात घर करून जाईल आणि त्यात गैर काहीच नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Caviar / कॅविअर नावाच्या हिरे आणि सोन्यानं आयफोन सजवणाऱ्या कंपनीनं नुकतंच अॅपलच्या विजन प्रो हेडसेटपासून प्रेरणा घेत  iPhone 15 Pro आणि 15 Pro Max या दोन्ही फोनचे खास वर्जन तयार केले आहेत. अॅपच्या मोबाईलमधील अनेक फिचर तुम्हाला इथं दिसत असले तरीही त्याची किंमत मात्र दिवसा चांदणं दाखवतेय असं म्हणणं गैर ठरणार नाही. 


Apple Vision Pro पासून नेमका कसा फोन बनवलाय? 


कॅविअरच्या माहितीनुसार आलिशान आणि लाखात एक असणाऱ्या गोष्टींमध्ये आवड असणाऱ्यांसाठी हा फोन तयार करण्यात आला आहे. ज्यासाठी Apple Vision Pro पासूनच प्रेरणा घेण्यात आली आहे. या फोनच्या मागची बाजूही लक्ष वेधत आहे. 


कॅविअरच्या फोनचा खालचा भाग विजन प्रो सारखात दिसत असून, तुम्हाला अॅपलविषयी विषेश जिव्हाळा वाटत अलेल, तर हा फोन नक्कीच आवडेल. कॅविअरच्या या iPhone 15 Pro ची किंमत $8,060 इतकी असून भारतीय चलनानुसार हा आकडा 6,68,000 इतक्यावर पोहोचत आहे. 


हेसुद्धा वाचा : 'हिरोबरोबर शरीरसंबंध ठेवण्यासाठी माझ्यावर दबाव टाकणारी व्यक्ती होती...'; थेट नाव घेत अभिनेत्रीचा खुलासा


प्राथमिक माहितीनुसार हा अफलातून आयफोन कॅविअरच्या  "फ्यूचर कलेक्शन"चा भाग असून, त्यामध्ये टेस्लाच्या सायबर ट्रॅकशी प्रेरणा घेत तयार करण्यात आलेला सॅमसंग एस अल्ट्राचाही समावेश आहे. कॅविअरच्याच आयफोन 15 प्रो सीरिजमध्ये इमिर एडिशन, मॅग्नम आयफोन 15 सीरिजमध्ये रोल्स रॉयस फँटमसारखं डिझाईन आणि स्कायलाईन 15 प्रो सीरिजला जागतिक ख्यातीच्या आर्किटेक्ट आणि डिजाइनर जहा हदीदपासून प्रेरणा घेत तयार करण्यात आलं आहे. महाग, अती महाग आणि त्यानंतर त्याहीपेक्षा महाग अशा या कॅविअरच्या आय़फोनबाबत तुम्हाला काय वाटतं?