Google Chrome Bug: तुम्हीही Google Chrome वापरत असाल तर सावधान. सरकारी यंत्रणेकडून गुगल क्रोम वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. Google Chrome मध्ये आढळलेल्या एका त्रुटीमुळे हॅकर्स याचा फायदा उचलू शकतात. धोक्याची बाब म्हणजे या त्रुटीमुळे तुमच्या डिव्हाईसचा संपूर्ण ऍक्सेस हॅकर्सच्या हातात जाण्याचीही शकयता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुगल क्रोम ( Google Chrome ) हे विंडोजवर सर्वाधिक वापरलं जाणारं वेब ब्राउझर आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. अशात गुगल क्रोम युजर्ससाठी महत्त्वाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय सरकारच्या एका एजन्सीकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. रिपोर्टनुसार इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने याबाबत इशारा दिला आहे.  


हा इशारा Google Chrome डेस्कटॉप युझर्ससाठी देण्यात आला आहे. यामध्ये काही त्रुटी आढळून आल्या आहेत.याने हॅकर्स सहजतेने तुमच्या कॉम्प्युटरचा ताबा घेऊ शकतात. या " target="_blank"> त्रुटीमुळे अटॅकर्स सिक्युरिटी रिस्ट्रिक्शन्स बायपास करू शकतात. 


CERT-In  ही संस्था IT मंत्रालयांतर्गत काम करते. या सायबर एजन्सीच्या माहितीनुसार गुगल क्रोममध्ये असणारी ही त्रुटी अनेक कारणांमुळे आहे. याचा फायदा हॅकर्स उचलू शकतात. यामध्ये हॅकर्स आरबीटरी कोडचा वापर करू शकतात. यामुळे एका विशिष्ठ कॉम्प्युटरची सिक्युरिटी रिस्ट्रिक्शन बायबाय केले जाऊ शकतात. (CVE-2022-2856) या त्रुटींबाबतची माहिती प्रचंड वेगाने पसरली. मात्र कंपनीला याबाबत माहिती मिळताच गुगलकडून यावर काम करण्यात आलं आहे.  


या त्रुटीचा फटका तुम्हाला बसू नये म्हणून तातडीने तुमचं क्रोम अकाऊंट अपडेट करा. अशात तुम्ही जुन्याच Google Chrome डेस्कटॉप व्हर्जन वापरत असाल तर तात्काळ सिक्युरिटी पॅचचा वापर करा. CERT-In ने या आधी Apple iOS, iPadOS आणि macOSमधील त्रुटींबाबत इशारा दिला होता.


CERT In issued serious security bug in google chrome which can compromise your data