नवी दिल्ली : सॅमसंग दरवर्षी आपल्या गॅजेट्समध्ये काही ना काही तरी नवीन देण्याचा प्रयत्न करताना दिसतात. आता सॅमसंग २०२० मध्ये येणाऱ्या सात नव्या QLED टिव्हीचा खुलासा करणार आहे. लास वेगासमध्ये सुरु असलेल्या CES 2020मध्ये आतापर्यंत अनेक प्रोडक्ट समोर आले आहेत. याच लिस्टमध्ये bezel less टीव्हीची चर्चा आहे. 


काय आहेत फिचर्स -


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इलेक्ट्रॉनिक्स निर्माता सॅमसंग यावर्षी अनेक नवीन टीव्ही लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. CES 2020 एक्स्पोमध्ये Q950TS 8K QLED या टीव्हीची झलक दाखवण्यात आली. या टीव्हीला झिरो बेजल डिस्प्ले आणि जबरदस्त साऊंड सिस्टम देण्यात आला आहे. याशिवाय 8K QLEDsचे Q900TS आणि Q800T हे टीव्हीदेखील लॉन्च होणार आहेत. १५mm अल्ट्रा स्लिम डिझाइनसह आलेल्या टीव्हीमध्ये एक AI क्वांटम प्रोसेसर देण्यात आला आहे. 


यावेळी सॅमसंग ६५ इंची, ७५ इंची आणि ८५ इंची मॉडेलऐवजी Q950TS सह, ५५ इंची ते ९८ इंची स्क्रिनपर्यंतचे टीव्ही बाजारात आणणार आहे. सॅमसंगने यावर्षी येणाऱ्या QLED पॅनलसह पाच 4Kटीव्हीचीही घोषणा केली आहे. यात "Q60T, Q70T, Q80T, Q90T आणि Q95T असा मॉडेलचा समावेश आहे. 


या सर्व टीव्हीमध्ये टॅप व्यूचा ऑप्शन मिळणार आहे. त्याद्वारे फोनची स्क्रिन, सॅमसंग टीव्हीशी कनेक्ट करता येऊ शकते.