मुंबई : गूगल क्रोमला (Google Chrome) जगातील सर्वात लोकप्रिय ब्राउझर मानले जाते. त्यात सतत नवीन नवीन बदल होत असतात. आता सुद्धा गूगल क्रोमने (Google Chrome) एक नवीन बदल केला आहे, जो यूझर्ससाठी खूप फायदेशीर ठरेल. या नवीन अपडेटमध्ये यूझर्सना  चांगल्या क्वालिटीचा व्हिडीओ पाहायला मिळेल. तसेच त्यांचा डेटा देखील कमी वापरला जाईल. त्याशिवाय इंटरनेटची स्पीड कमी असली तरी मोबाईल चांगला चालू शकेल.


व्हिडीओ जलद अपलोड होतील


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता तुम्ही तुमच्या मोबाईलवर कोणताही व्हिडीओ सहजपणे आणि न थांबता पाहू शकता. तसेच व्हिडीओला लोड होण्यास देखील जास्त वेळ लागणार नाही. या व्यतिरिक्त यूझर्स कोणतीही फाईल जलद गतीने अपलोड करु शकेल. गूगल क्रोम 90 वर यूझर्सना डायरेक्ट कॉपी आणि पेस्टचा पर्याय देखील मिळत आहे.


व्हिडीओची क्वालिटी अधिक चांगली


अपडेटनंतर, यूझर्सना व्हिडीओ कॉलिंग करण्यासाठी पूर्वीपेक्षा चांगली व्हिडीओ क्वालिटी मिळणार आहे. याव्यतिरिक्त, यूझर्सना PDF XFA चा चांगला सपोर्ट देखील मिळेल. या अपडेटमध्ये यूझर्सना पूर्वीपेक्षा जास्त सोफ्टी मिळेल. यामध्ये स्क्रीन शेअरिंग पूर्वीपेक्षा चांगले होईल.


जरी तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या हॉटस्पॉट लॅपटॉपला कनेक्ट केला तरी तुम्हाला व्हिडीओ क्वालिटी चांगली मिळेल. त्याशिवाय स्क्रिन शेअरींग देखील पहिल्यापेक्षा चांगल्या प्रकारे चालेल.


डेटा बचत


क्रोम 90 नवीन कोडेक्ससह येते जे चांगले कॉम्प्रेशन देते. यामुळे यूझर्सना अधिक चांगली व्हिडीओ क्वालिटी मिळते आणि डेटा बचत होते.


आता मिळणार Floc


Floc म्हणजे फेडरेट लर्निंग ऑफ कोहोर्ट्स हा थर्ड पार्टी कुकीजला जाहिराती दाखवण्यापासून थांबवतो. त्यामुळे आता जाहिरातदार डिजिटल एड्ससाठी जाहिराती तयार करणार नाही, तर Floc 1 हजार लोकांचा गट तयार करेल, ज्यामध्ये लोकांच्या आवडीनुसार जाहिरात दाखवली जाईल.


HTTPS चा वापर


या फीचरमध्ये, यूझर्सने क्रोम 90 वर वेबसाईट उघडल्यास, क्रोम 90 ऑटोमॅटीक HTTPS वर्जन जनरेट करेल, जे जुन्या HTTP वर्जनपेक्षा अधिक सुरक्षित आणि वेगवान असेल. याचा वापर केल्याने वेबसाइट वेगवाने उघडतील.