नवी दिल्ली : मोबाईल फोनचे जसे फायदे आहेत तसे अनेक तोटेही समोर येत असतात. तरीही याकडे दुर्लक्ष करणाऱ्या एका १२ वर्षाच्या मुलाला याची मोठी किंमत चुकवावी लागली. मोबाईलचा चुकीचा उपयोग केल्याने त्याला आपला जीव गमवावा लागला. कोरिया जिल्ह्यातील खुतरापारा गावात ही घटना घडली. मोबाईलवर गेम खेळताना मोठा स्फोट होऊन त्याचा जीव गेला. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, तो मुलगा मोबाईल चार्जिंगला लावून गेम खेळत होता. रवि सोनवान असे या तरुणाचे नाव आहे. हा स्फोट एवढा मोठा होता की मुलाच्या आतड्या यामुळे बाहेर आल्या. एका मोठ्या कपड्यात गुंडाळून त्याला उपचारासाठी नेण्यात आले. या स्फोटामध्ये त्याचा एक मित्रदेखील जखमी झाला. जवळच्या अंबिकापुर हॉस्पीटलमध्ये त्याला दाखल करण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चालकांच्या स्ट्राईकमुळे दोघांना रुग्णालयात पोहोचविण्यात रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. हा मोबाईल कोणत्या कंपनीचा होता याबद्दल काही माहीती मिळाली नाही. अशीच एक घटना मध्य प्रदेशमधील राजगढमध्ये समोर आली होती. ज्यामध्ये मोबाईल चार्जिंगला लावून ५ वर्षाचा मुलगा खेळत असताना मोबाईलचा स्फोट झाला. यामध्ये मुलाचे हात उडाले आणि एक बोट राहिले. याआधीही मोबाईल स्फोट होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.


काय काळजी घ्याल ?


फोन चार्जिंगला असताना त्याचा वापर करु नका. पूर्ण चार्ज झाल्यानंतरही मोबाईल चार्जिंग पोर्टवरून काढायला हवा.मोबाईलला त्याच्या ओरिजनल चार्जरनेच चार्ज करायला हवं.