मुंबई : Phone calls for 5G SIM and network, scam gang active in Chhattisgarh : देशभरात  5G सुरु झाले. लोक एकदम फास्ट नेटवर्क मिळणार म्हणून खूश झाले. मात्र, आता तुम्हाला सावध करणारी बातमी आहे. मोबाईलमध्ये 5G अपडेट करण्याच्या नावाने गंडा घालणारी टोळी सक्रिय झाली आहे. छत्तीसगडमध्ये ओटीपी मागून अनेकांची बँक खातं खाली करण्यात आल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमचा मोबाईल 5G करायचाय असा फोन आला तर सावध व्हा. कारण, तुमचा फोन 5G करण्याच्या बहाण्याने तुमचं अकाऊंट खाली होऊ शकतं. ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीचा छत्तीसगडमध्ये पर्दाफाश करण्यात आला आहे. ( Chhattisgarh police bust gang of 5 G fraudsters, links found in Jharkhand)


ही टोळी फोन करून मोबाईलमध्ये 5Gअपडेट करून देतो असं सांगते. यानंतर टोळी प्रोसेस करण्याच्या नावाखाली मोबाईलवर लिंक पाठवते. आणि या लिंकच्या आधारे पर्सनल माहिती काढून ओटीपी मागते. यातूनच ही टोळी बँक अकाऊंट खाली करून फसवणूक करत आहे.


छत्तीसगडच्या रायपुरमध्ये असे फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे तुम्हाला जर असा फोन आला तर आधी खात्री करा. नाहीतर भामटे तुम्हालाही गंडा घालू शकतात आणि तुम्हाला डोक्याला हात लावण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल. त्यामुळे वेळीच सावध व्हा.