जबरदस्त लूक असलेली Citroen C3 गाडी भारतात लाँच, किंमत फक्त 5.71 लाख रुपये
Citroen C3 या गाडीच्या प्रतीक्षेत असलेल्या कारप्रेमींसाठी खूशखबर आहे. कंपनीने भारतीय बाजारात 5.71 लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमत असलेली Citroen C3 गाडी लाँच केली आहे.
Citroen C3 Launch In India: Citroen C3 या गाडीच्या प्रतीक्षेत असलेल्या कारप्रेमींसाठी खूशखबर आहे. कंपनीने भारतीय बाजारात 5.71 लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमत असलेली Citroen C3 गाडी लाँच केली आहे. या गाडीची बुकिंग लाँचिंगपूर्वीच सुरु झाली होती. 21 हजार रुपयांची टोकन अमाउंट देऊन ग्राहक गाड्या बूक करत आहेत. Citroen C3 सब कॉम्पॅक्ट 4 मीटर एसयूव्ही असून हॅचबॅक कार असल्याचं देखील बोललं जातं. याचं टॉप मॉडेल 8 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते. गाडी भारतीय बाजारात 4 सिंगल कलर आणि 6 ड्युअल टोन कलर पर्यायात उपलब्ध आहे. ही एसयूव्ही 1.2 लीटर नॅच्युरल एस्पिरेटेड पेट्रोल आणि 1.2 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनमध्येही दिसते. माहितीनुसार ही गाडी 19.8 किमीचा मायलेज देते.
एसयूव्हीसोबत 56 कस्टमाइजेशन ऑप्शन आणि 70 हून अधिक अॅक्सेसरीज पॅकेजचा पर्याय आहे. यात एलईडी डीआरएल, हेडलँप, टेललँप, ड्युअल टोन सी पिलर असेल. सिट्रोएन सी 3 मध्ये अँड्रॉइड ऑटो आणि अॅप्पल कार प्ले सपोर्टवालं 10 इंच टचस्क्रिन इन्फोटेनमेंट सिस्टम, रिमोट कीलेस एंट्री, स्पीड सेन्सेटिव्ह ऑटो डोअर लॉक, 4 स्पीकर ऑडिओ सिस्टम, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल, फ्रंट यूएसबी चार्जर, मॅन्युअल अडजस्टेबल ड्रायव्हर सीट, रियर पॉवर विंडो सारखे फिचर आहेत. या कारला कॉमन मॉज्यूलर प्लॅटफॉर्मवर तयार केलं आहे.
सिट्रोएन सी 3 चं इंजिन 1.2 लीटर नॅच्युरली एस्पिरेटेड पेट्रोलवर अधारित असून 82 पीएस पॉवर आणि 115 एनएम टॉर्क जनरेट करते. 1.2 टर्बो पेट्रोल इंजिन 110 पीएसपर्यंत पॉवर आणि 190 एनएम टॉर्क जनरेट करते. एसयूव्हीत 5 स्पीड मॅन्युअलसह 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन ऑप्शन देण्यात आलं आहे.