मुंबई : सध्या व्हॉटस्अ‍ॅपचे २५ कोटींपेक्षा जास्त युजर्स आहेत. व्हॉटस्अ‍ॅप नेहमी नवीन नवीन फीचर आणत असतं. काही दिवसांपूर्वीच टेक्स्ट फॉर्मेटींगची सुविधा व्हॉट्सअॅपने आणली होती. ज्यामुळे अक्षरे वळणदार, ठळक करता येतात. आता तुम्हाला अक्षरांचा रंग देखील बदलता येणार आहे. अर्थात मुख्य चॅटींगमध्ये हे फिचर देण्याआधी व्हॉटस्अ‍ॅपने स्टेटस अपडेट करण्यासाठी सुविधा दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुणीही स्टेटस या टॅबवर क्लिक करून त्याला अपडेट करू शकतो. व्हॉटस्अ‍ॅपच्या व्ही 2.17.291 या बीटा आवृत्तीचा वापर करणार्‍या काही युजर्सला यावर क्लिक केल्यानंतर कॅमेर्‍याच्यावर पेन्सिलचा आयकॉन दिसू लागला आहे. यावर क्लिक केल्यानंतर युजरला इमोजी, रंगीत पार्श्वभाग आणि रंगीत शब्द आदींनी युक्त असणारे स्टेटस अपडेट करता येते. 


व्हॉटसअ‍ॅपने या वर्षाच्या सुरुवातीला स्टेटस अपडेट करण्याची सुविधा दिली. या पार्श्वभूमीवर आता रंगीत स्टेटस अपडेट करण्याची सुविधा लोकप्रिय होऊ शकते.