नवी दिल्ली : डिजिटल फायनेंशियल सर्विसेज प्लेटफॉर्म मोबिक्विकने आपल्या ग्राहकांसाठी e-KYC वेरिफिकेशन पूर्ण करण्याच्या संदर्भात प्रेरीत करण्यासाठी पाऊल उचलले आहे. तुम्ही देखील ई-वॉलेट वापरत असाल किंवा मोबिक्विकचे ग्राहक असाल तर ई-केवाईसी तर्फे तुम्हाला सुपरकॅश मिळेल. मोबिक्विकने आपल्या ग्राहकांसाठी ही ऑफर सादर केली आहे. ग्राहक आपले केवायसी आधार कार्ड जोडून 300 रुपयांचे सुपरकॅशचा फायदा उचलू शकतात. ग्राहकांना सुपरकॅश 300 रुपयांच्या कोड स्वरुपात मिळेल. याचा वापर तुम्ही बिल भरण्यासाठी, रिचार्ज आणि इतर कोणतेही काम करताना होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोबिक्विकने सांगितले की, ग्राहकांना e-KYC पूर्ण करण्यासाठी फक्त 60 सेकंदाचा कालावधी लागेल. e-KYC पूर्ण करण्यासाठी आणि सुपरकॅश घेण्यासाठी ग्राहकांना फक्त तीन स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.


3 सोप्या स्टेप्स


कंपनीने सांगितले की, मोबिक्विक वॉलेट युजर्सला ई-केवायसी सुरू करण्यासाठी अॅपमध्ये लॉग इन करा. त्यानंतर आधार नंबर द्या. आधार रजिस्टर होण्यासाठी ग्राहकांच्या मोबाईलवर ओटीपी मिळेल. ओटीपी दिल्यानंतर ई-केवायसी पूर्ण होईल. सुपरकॅश भारतात कोणत्याही मोबाईल वॉलेटद्वारा सुरु केलेली ही लॉयलिटी आहे. या अंतर्गत मोबिक्विकमुळे प्रत्येक व्यवहारावर पैशांची बचत होते.


देशातील दुसरे सर्वात मोठे वॉलेट


मोबिक्विक युजर्सची संख्या नोटबंदीनंतर एका वर्षात तीनदा वाढून 10 कोटीपर्यंत पोहचली आहे. पेटीएमनंतर मोबिक्विक भारतातील दुसरे मोठे मोबाईल बॉलेट आहे. याचे 10 कोटींहुन अधिक युजर्स आहेत.


पेटीएम देत आहे 200 रुपयांच कॅशबॅक


आपल्या ग्राहकांना e-KYC साठी प्रोत्साहित करण्यासाठी पेटीएम e-KYC करणाऱ्यांना 200 रुपयांच कॅशबॅक देत आहे.