कसा निवडाल कॉम्प्यूटर माऊस ..
कॉम्प्यूटरवर काम करत असताना माऊस हा अत्यंत महत्त्वाचा घटक. माऊस चांगला तर, कॉम्प्यूटरवरचे काम अधिक सोपे होऊ जाते. म्हणूनच माऊस निवडताना काळजी घ्या. ही काळजी घेताना कोणत्य गोष्टी विचारात घ्याल..? त्यासाठी जाणून घ्या काही महत्त्वाच्या टिप्स…
मुंबई : कॉम्प्यूटरवर काम करत असताना माऊस हा अत्यंत महत्त्वाचा घटक. माऊस चांगला तर, कॉम्प्यूटरवरचे काम अधिक सोपे होऊ जाते. म्हणूनच माऊस निवडताना काळजी घ्या. ही काळजी घेताना कोणत्य गोष्टी विचारात घ्याल..? त्यासाठी जाणून घ्या काही महत्त्वाच्या टिप्स…
माऊस दोन पद्धतीचे असतात. एक ऑप्टिकल आणि दूसरा म्हणजे लेजर. ऑप्टिकर माउस LED च्या वापरातून आपणास काय करायचे आहे ते समजू शकते. तर लजर माऊसमध्ये लेजरचा वापर करून माऊसची दिशा समजू शकते. त्यामुळे ऑप्टिकल माऊसला केवळ साधारण कामासाठी वापरले जाते. तर लेजर माऊस आपण अत्यंत गुळगुळीत अशा ठिकाणीही वापरू शकतो. अशा प्रकारचा माऊस तुम्ही काचेवरही वापरू शकता. ज्या लोकांना कॉम्प्यूटरवर गेम खेळायची सवय असते अशा लोकांना हा माऊस खूपच महत्त्वाचा ठरतो.
आपण जर ऑफिसमध्ये काम करत असाल. तर आपल्यासाठी वायरलेस माऊस फायदेशीर ठरतो. कारण अशा प्रकारचा माऊस हाताळण्यास फारच सोईचा असतो. आपण जर चांगल्या क्वॉलिटीचा माऊस घेतला तर त्याची बॅटरी अनेक काळ टिकते व वायरलेस माऊस तुम्ही जास्तीत जास्त दिवस वापरू शकता.
जर तुम्ही ब्लुटूथवाला माउस खरेदी केला असेल तर, आपल्या संगणकाचे USB पोर्टही वापरले जाणार नाही. वायरलेस माऊसमध्ये आपल्याला RF (रेडियो फ्रिक्वेंन्सी) वाले माऊसही भेटतात.
थोडक्यात पण महत्त्वाचे
जर आपण माऊसचे डोंगल हरवले तर मात्र, आपल्या माऊसचा काहीच उपयोग नाही. माऊस खरेदी करताना पहिल्यांदा हे लक्षात घ्या की, तुमची गरज काय आहे. गरज आणि आवश्यकता लक्षात घेऊन माऊस खरेदी केलेली केव्हाही चांगले.