नवी दिल्ली : मोबाइल अॅप्सचे वाढता वापर देशाच्या सुरक्षिततेसाठी धोका निर्माण करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुप्त एनजन्सीकडून देशाच्या सुरक्षिततेसाठी हे ४० अॅप्स धोकादायक असल्याचे सांगून लगेच हटवण्याचे आदेश दिले आहेत. गुप्त एजन्सीकडून याची एक यादी जाहीर झालेली आहे. सुरक्षा दलातील जवानांनी आणि अधिकाऱ्यांनी खालील अॅप्सचा वापर न करण्याचे सांगितले आहे. हे अॅप्स फक्त भारताच्या सुरक्षिततेसाठी खतरा आहेत असं नाही तर सायबर अटॅकचा देखील करू शकतो. 


तज्ञांच्या माहितीनुसार अनेक एंड्रॉइड आणि आयओएसमधील अॅप्स चीनच्या सॉफ्टवेअर इंजिनिअर लोकांनी तयार केले आहे. तर काही अॅप्स चीनच्या कंपनीने तयार केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सगळ्या अॅप्सचे सॉफ्टवेअर किंवा मालवेअर धोकादायक असल्याचं सांगितलं जातं आहे. या अॅप्सद्वारे डाटा आणि अन्य माहिती हॅक केली जाऊ शकते. गेल्या काही दिवसांपासून अशी माहिती समोर आली आहे. या अॅप्सची संख्या ही ४० पेक्षा अधिक सांगण्यात येत आहे. 


सुरक्षा दलांना देण्याता आला अलर्ट 


सीमेवर सुरक्षा रक्षकांना भारतीय सुरक्षा एजन्सींकडून चीनी अॅप्स अनइंस्टॉल करण्यास सांगितले आहे. अशी शंका आहे की चीन यामार्फत डेटा चोरत आहे. चीनी सीमेच्या बॉर्डरवर तैनात असलेल्या जवानांना स्मार्टफोनमधून वीचॅट, ट्रूकॉलर, विबो, यूसी ब्राऊजर आणि यूसी न्यूज हे अॅप्स हटवण्यास सांगितले आहेत. 


हे अॅप्स आहेत खतरनाक 


४० अॅप्सची जी यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये वीबो, वीचॅट, शेअरइट, ट्रूकॉलर, यूसी न्यूज, यूसी ब्राऊजर, ब्यूटी प्लस, न्यूजडोग, वीवा व्हिडिओ, क्यू व्हिडिओ, आयएनसी, पॅरालल स्पेस, अपुस ब्राऊजर, परफेक्ट कार्प, वायरलल क्लीनर हाई सिक्युरिटी लॅब, सीएम ब्राऊसर, एमआय कम्युनिटी, डयू रिकॉर्डर, वाल्ट हाइड, यूकॅम मेकअप, एमआय स्टोर, कॅचक्लीनर डयू एप्स, डयू बैटरी सेवर, डयू क्लीनर, डयू प्राइवसी, 360 सिक्युरिटी, डयू ब्राउसर, क्लीन मास्टर-चीता मोबाइल, बॅडू
 ट्रांसलेट, बॅडू एप, वंडर कॅमरा, ईएस फाइल एक्सप्लोरर, फोटो वंडर, क्यूक्यू इंटरनॅशनल, क्यूक्यू म्यूजिक, क्यूक्यू मेल, क्यूक्यू प्लेयर, क्यूक्यू न्यूजफीड, क्यूक्यू सिक्युरिटी, सेल्फी सिटी, मेल मास्टर, एमआय व्हिडियो कॉल आणि क्यूक्यू लाँचर सहभागी आहेत.