नवी दिल्ली : जर तुमच्याकडे स्मार्टफोन आहे तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.


४२ अॅपची यादी जाहीर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये अनेक अॅप डाऊनलोड केले असतील. पण त्यामध्ये असे काही अॅप आहेत जे भारत सरकारच्या संरक्षण खात्याने भारतीय जवानांना डिलीट करण्यासाठी सांगितले आहेत. संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या या नोटीफिकेशनमध्ये या अॅपची यादी देण्यात आली आहे. ज्यामध्ये ४२ चायनिज अॅपचा समावेश आहे.


माहिती चोरणारे अॅप


या अॅपवर माहिती चोरण्याचा आरोप लागला आहे. मोबाईलमधली माहिती यामधून लीक होत असल्याची बाब समोर येत आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय गृह मंत्रालयाला RAW, IB आणि NTRO सारख्या गुप्तचर संस्थांनी ही माहिती दिली आहे. त्यानंतर या ४२ अॅपची यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्यामध्ये ट्रुकॉलरचा देखील समावेश आहे.


चायनिज अॅपचा समावेश


Mi स्टोर देखील यादीत आहे. ज्या सगळ्या शाओमी स्मार्टफोन्समध्ये प्रीइंस्‍टॉल असतो. चीनची पॉप्यूलर मॅसेंजिंग अॅप वीचॅट, फाइल ट्रांसफर करणारा शेअर इट अॅप देखील या यादीत आहे. हे ४२ अॅप मोबाईलमधून डिलीट करण्यात सागितले आहे.


पाहा व्हिडिओ, तुम्ही रोज वापरताय हे अॅप



या अॅप्सचा देखील आहे समावेश


ES File Explorer, Photo Wonder, QQ International, QQ Music, QQ Mail, QQ Player, QQ NewsFeed, WeSync, QQ Security Centre, SelfieCity, Mail Master, Mi Video call-Xiaomi, and QQ Launcher