Digital Detox  : फोन ही अशी एक वस्तू आहे जिच्याशिवाय आजकाल बहुतेक लोकांना जगणे कठीण झाले आहे.  प्रत्येक व्यक्तीची सकाळी उठल्याबरोबर ते रात्री झोपेपर्यंत कुठली ना कुठली कामं सतत फोनशी जोडलेली असतात. फोनचे व्यसन आता लहान मुलांपर्यंतही पोहोचले आहे, जिथे एक वर्षाची लहान मुलेही यूट्यूबवर व्हिडिओ पाहिल्याशिवाय जेवत नाहीत. फोन आणि इतर डिजिटल उपकरणांपासून स्वतःला दूर ठेवणे आता खूप कठीण आहे. जास्त स्क्रीन टाइममुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि मानसिक ताणही वाढतो. तर आजकालचे लोक फोनपासून लांब राहण्यासाठी डिजीटल डिटॉक्स करतात. डिजीटल डिटॉक्स नक्की काय असतं आणि तुम्ही फोनपासून कसे लांब रहाल हे जाणून घेऊया. 


डिजिटल डिटॉक्सचा म्हणजे काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोन, टॅब्लेट किंवा इतर उपकरणांमुळे आपण तणावाखाली राहतो. सोशल मीडियावरील अपडेट्स  किंवा फोनमध्ये तासनतास घालवल्याने आपले मन नेहमी व्यस्त आणि त्यामुळेच रात्री झोपही लागत नाही. या समस्येवर उपाय म्हणजे डिजिटल डिटॉक्स, ज्यामध्ये आपण फोन आणि इतर उपकरणांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. फोनचे व्यसन आपल्याला सिगारेटच्या व्यसनासारखे त्रास देते. 


कसं कराल डिजीटल डिटॉक्स? 


गोल सेट करा : डिजिटल डिटॉक्स का करायचे आहे हे शोधा. तुम्हाला तुमचे मानसिक आरोग्य की वैयक्तिक आयुष्य सुधारण्यासाठी डिटॉक्स करायचे आहे हे ठरवा. हे कळलं की तुम्ही स्वतःला फोनपासून दूर राहू शकाल.


लिमीट सेट करा : तुम्ही फोनच्या व्यसनानं त्रस्त असाल, तर सगळ्यात आधी त्याचा वापर कमी करा. स्क्रीन टाइमिंग शेड्यूल करा, अशाने तुम्ही तुमच्या इतर कामांवरही लक्ष केंद्रित करू शकता. अशा प्रकारे, मुलांची फोनची सवय सोडणे खूप उपयुक्त आहे.


इतर ऍक्टिव्हिटी मध्ये भाग घ्या : अशा काही ऍक्टिव्हिटी शोधा जयात तुम्हाला आनंदी आणि शांत ठेवू शकतात. तुमचे आवडते पुस्तक वाचा, कला, संगीत किंवा छंद जोपासत रहा. अशा गोष्टी केल्यां तुमचे मन शांत आणि सक्रिय राहण्यास मदत होईल.


हेही वाचा : घरी बसलेल्या Hemangi Kavi ला नवऱ्याने पाठवले वटपौर्णिमेची पूजा करणाऱ्या महिलांचे फोटो, "दारातच मी त्याला म्हटलं..."


इतरांना सांगा : तुम्‍हाला फोन आणि डिव्‍हाइसचा वापर कमी करायचा असल्‍यास, तुम्‍ही इतरांना तुमच्‍या डिजीटल डिटॉक्‍स विषयी सांगा. आपण आगाऊ सांगितले तर, ते आपल्याशी संपर्क साधण्याची शक्यता कमी होईल. कारण जर तुम्ही त्यांना न सांगता इग्नोर केलत तर तुमचे नाते खराब होऊ शकते.


लिमीट ठरवा : फोनच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी, आपण लिमीट देखील निश्चित केल्या पाहिजेत. नोटिफिकेशन बंद करा आणि सोशल मीडियापासून दूर राहा. 


फोनच्या व्यसनापासून मुक्त होणे कठीण आहे, परंतु ते शक्य आहे. डिजिटल डिटॉक्सच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या सवयींवर नियंत्रण मिळवू शकता आणि तुमच्या जीवनात समाधान आणि स्थिरता आणू शकता. तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी ते फायदेशीर ठरेल. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)