Paytm यूजर्ससाठी Good News! कंपनीकडून अप्रतिम सेवा सुरू, जाणून घ्या याचे फायदे
आता सर्वत्र डिजीटल पेमेंटचा वापर लोकं करु लागले आहेत. ही सर्वत सोपी आणि वेळ वाचवणारी प्रक्रिया आहे.
मुंबई : आता सर्वत्र डिजीटल पेमेंटचा वापर लोकं करु लागले आहेत. ही सर्वत सोपी आणि वेळ वाचवणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे अगदी लहान व्यवहारांपासून ते मोठ्या-मोठ्या व्यवहारांपर्यंत लोकं डिजीटल पद्धतींचा अवलंब करु लागले आहेत. त्यात पेटीएम, BHIM UPI, Phone pe, Google pay सारख्या प्रसिद्ध प्लॅटफॉर्मचा लोकं वापर करु लागले आहेत. त्यात जी कंपनी ग्राहकांना चांगली सर्विस, कॅशबॅक किंवा रिवॉर्ड देते, त्या कंपनीच्या ऍप्सचा वापर ग्राहक मोठ्याप्रामाणावर करतातय ज्यामुळे सगळ्या डिजीटल प्लॅटफॉर्म कंपन्या एकापेक्षा एक वेगळं काहीतरी आणण्याचा प्रयत्न करत असतात.
त्यात आता आपल्या वापरकर्त्यांसाठी Paytm ने एक आनंदाची बातमी आहे. दैनंदिन व्यवहार सुलभ करण्यासाठी नवीनतम कार्ड सुरू केले. Paytm ने नवीनतम ट्रान्झिट कार्ड लॉन्च केले आहे. ते दैनंदिन गरजांसाठी वापरता येते. हे कार्ड मेट्रो, रेल्वे, राज्य सरकारी बस सेवा, व्यापारी दुकाने, टोल पार्किंग शुल्क आणि ऑनलाइन खरेदीसाठी वापरले जाऊ शकते. ज्याचा वापर करुन तुम्ही एटीएममधूनही पैसे काढू शकता.
बँकिंग व्यवहार सुलभ करण्यासाठी कंपनीने हे ट्रान्झिट कार्ड (Launch New Transit Card) सुरू केले. पेटीएम हे ट्रान्झिट कार्ड वॉलेटशी लिंक करेल. आता ग्राहकांना सर्व प्रकारची कार्डे सोबत घेऊन जाण्याची गरज भासणार नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
पेटीएमने हैदराबाद मेट्रो रेलसोबत भागीदारी केली आहे. जेणेकरून मेट्रोचे भाडे थेट ट्रान्झिट कार्डद्वारे भरता येईल. 'वन नेशन वन कार्ड' हे ब्रीदवाक्य असलेले हे नवीन कार्ड आहे. हे ट्रान्झिट कार्ड नियमितपणे मेट्रो, बस आणि ट्रेन सेवा वापरणाऱ्या 50 लाखांहून अधिक प्रवाशांसाठी उपयुक्त ठरेल.
तुम्ही पेटीएम ऍपद्वारे ट्रान्झिट कार्डसाठी अर्ज करू शकता. तुम्ही ते पेटीएम सेल्स पॉइंट्सवरून देखील मिळवू शकता. हे कार्ड थेट पेटीएम वॉलेटशी जोडले जाते. ज्यामुळे आता तुमच्याकडे इंटरनेट नसेल तरी तुम्ही याचा वापर करुन पैसे देऊ शकता.