मुंबई : वर्षाच्या सुरुवातीलाच मोटोरोला कंपनीनं त्यांच्या मोबाईलवर भरघोस सूट द्यायचा निर्णय घेतला आहे. मोटोरोलाच्या moto g5 plus या स्मार्टफोनवर तब्बल ४ हजार रुपयांची सूट मिळणार आहे. त्यामुळे १३,९९९ रुपयांना असलेला हा फोन ९,९९९ रुपयांना मिळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहेत moto g 5 plus चे फिचर्स


5.20 इंचाची स्क्रीन


2GHz ऑक्टा कोअर प्रोसेसर


4GB रॅम


32GB इंटरनल मेमरी


128GB एक्सपांडेबल मेमरी


12 मेगापिक्सल रियर कॅमेरा, 5 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा


अॅन्ड्रॉईड 7.0


मोटो G5S प्लसवरही सूट


मोटो G5S प्लस या स्मार्टफोनच्या किंमतीमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑगस्ट २०१७मध्ये हा स्मार्टफोन १५,९९९ रुपयांना लॉन्च करण्यात आला होता. आता १ हजार रुपयांची कपात करून हा स्मार्टफोन अमेझॉनवर १४,९९९ रुपयांना मिळणार आहे.


मोटो G5S प्लसची फिचर्स


64GB इंटरनल मेमरी (128GB एक्सपांडेबल)


4GB रॅम


13 मेगापिक्सल सेन्सर रियर कॅमेरा


क्वालकोम स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर


3,000mAh बॅटरी


टर्बोपावरमुळे 15 मिनिटांच्या चार्जिंगवर 6 तासांचा बॅकअप


5.5 इंच फूल एचडी स्क्रीन


गोरीला ग्लास