मुंबई: 'प्लिपकार्ट'वर सुरु असलेल्या 'रिपब्लिक डे सेल'मध्ये स्मार्टफोनच्या खरेदीवर आकर्षक अशी सूट मिळत आहे. रिअलमी कंपनीचा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी चांगली संधी आहे. फ्लिपकार्ट सेल दरम्यान रिअलमी स्मार्टफोनची सुरुवाती किंमत ९ हजार ४९९ रुपये आहे. एवढेच नव्हेतर एसबीआय कार्डच्या माध्यमातून फोन खरेदी केल्यास १० टक्के सवलत मिळणार आहे.  इएमआयवरही स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. यातून प्रत्येक महिन्याला ३१६ रुपये इएमआय भरावा लागेल. रिअलमी २ प्रो आणि रिअलमी सी१ या स्मार्टफोनच्या खरेदीवरही मोठी सवलत देण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


रिअलमी २ प्रो 


 


रिअलमी २ स्मार्टफोनच्या खरेदीवर २ हजार रुपये वाचवू शकतात. ४ जीबी रॅम असणारा स्मार्टफोनची किंमत १४ हजार ९९० रुपये आहे. फ्लिपकार्ट रिपब्लिक डे सेल अंतर्गत या स्मार्टफोनची किंमत १२ हजार ९९० रुपये देण्यात आली आहे. जुना फोन एक्‍सचेंज केल्यास हा स्मार्टफोन १२ हजार रुपयांना मिळणार आहे. ६ जीबी रॅम असलेला स्मार्टफोनची किंमत १४ हजार ९९० रुपये करण्यात आली आहे. तसेच ८ जीबी रॅम असलेला स्मार्टफोन १६ हजार ९९० रुपयांना मिळत आहे. या स्मार्टफोनवर कंपनी बायबॅक ऑफर देत आहे.


 


रिअलमी सी १


 
रिअलमीचा स्मार्टफोन सी १ ची किंमत ७ हजार रुपये आहे. सेल दरम्यान या स्मार्टफोनची विक्री ६ हजार ९९९ रुपयात केली जात आहे. या स्मार्टफोनवर ६ हजार ८५० रुपये एक्सचेंज बोनस देण्यात येत आहे.