WhatsApp Missed Call Alert: व्हॉट्सअ‍ॅप हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. व्हॉट्सअ‍ॅप यूजर्ससाठी (WhatsApp) सतत नवनवीन अपडेट्स येत असतात. अलीकडेच, तीन नवीन फीचर्सची घोषणा करण्यात आली आहे. आता व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस यूजर्ससाठी नवीन अपडेट येत आहे. व्हॉट्सअ‍ॅप नवीन अ‍ॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस सादर करणार आहे. लवकरच इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आपल्या युजर्ससाठी नवीन 'Do not Disturb' अ‍ॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस आणणार आहे. या फीचरनंतर डू नॉट डिस्टर्ब मोड ऑन केल्यानंतर यूजरला व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या कॉल्सची माहिती मिळेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फीचरशी माहिती WABetaInfo वर देण्यात आली आहे. अपडेट येण्यासाठी काही वेळ लागू शकतो.  या नवीन अपडेटनंतर 'डू नॉट डिस्टर्ब' चालू केल्यानंतर यूजरला चॅटमध्ये व्हॉट्सअ‍ॅपवर मिस्ड कॉलची माहिती मिळेल. या नवीन अलर्टचा स्क्रीनशॉटही रिपोर्टमध्ये शेअर करण्यात आला आहे. यापूर्वी iOS बीटा वापरकर्त्यांना हे अपडेट मिळाले होते. त्याचबरोबर आता अँड्रॉइड व्हॉट्सअ‍ॅप बीटा यूजर्सना देखील हे फीचर लवकरच मिळू शकते.


iPhone 14 चे क्रॅश डिटेक्शन फीचर पास की फेल? यूट्यूबरने चाचणी केली आणि...


व्हॉट्सअ‍ॅप बर्‍याच दिवसांपासून अनेक नवीन फीचर्स आणण्याच्या तयारीत आहे. यामध्ये पोल, एडिट, व्हॉइस स्टेटस अपडेट यासारख्या फीचर्सचा समावेश आहे. याशिवाय या यादीत WhatsApp अवतार फीचर देखील आहे.