मुंबई : आजकाल व्हॉट्सअॅप सर्रास वापरले जाते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच ज्याची भुरळ पडली आहे असे हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड केले जाते. पण हे अॅप डाऊनलोड करण्यापूर्वी जरा थांबाच. कारण सध्या प्ले स्टोअरवर व्हॉट्सअॅपचं एक बनावट व्हर्जन उपलब्ध आहे आणि डाऊनलोड करणं धोक्याचं ठरू शकतं. ५ हजारांहून अधिक यूजर्स या बनावट व्हॉट्सअॅपच्या जाळ्यात अडकले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

''Update WhatsApp Messenger'' या नावाने हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर दिसतं. 'WhatsApp Inc' ने ते विकसित केल्याचा उल्लेखही करण्यात आला आहे. ते ५ हजार वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. त्याचबरोबर प्ले स्टोअरवर याच नावाचे आणखी एक अॅप आहे जे १० लाख वेळा डाऊनलोड झाले आहे. 


हे बनावट अॅप धोकादायक असून त्यामुळे फोनमधील माहिती चोरीला जाण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे युजर्सची बदमानी देखील होऊ शकते, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. इतकंच नाही तर फोनमध्ये व्हायरस जाण्याची शक्यता देखील वर्तण्यात येत आहे. एका ट्विटर यूजरने या बनावट अॅपची माहिती WABetaInfo या व्हॉट्सअॅप ट्रॅकिंग वेबसाईटला दिली. त्यामुळे हे अॅप डाऊनलोड करू नका, असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत व्हॉट्सअॅपने प्ले स्टोअरला कळवून ते काढून टाकण्याची मागणी करावी, असेही या वेबसाईटने म्हटले आहे.