Road Accident: गाडीचा अपघात झाला तर घाबरू नका! लगेच अशी पावलं उचला अन्यथा..
आपल्या हातूनही कळत-नकळत अपघात झाला तर घाबरू नका, अशी काळजी घ्याल
Road Accident Tips: देशात दरवर्षी अपघातात हजारो लोकांचा जीव जातो. त्यामुळे केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने वाहतूक नियमांपासून गाड्यांमध्ये महत्त्वाचे बदल सुचवले आहेत. गाड्यांमध्ये एअरबॅग्स अनिवार्य केल्या आहेत. यामुळे रस्ते अपघातातील मृत्यूचं प्रमाण घटलं आहे. असं असलं तरी रस्ते अपघात पूर्णपणे टळलेले नाही. आपल्या हातूनही कळत-नकळत अपघात होतो. जर तुमच्या हातूनही असाच अपघात झाला तर घाबरू नका. कारण कधी कधी आपली चूक नसते आणि त्याचा नाहक त्रास आपल्याला सहन करावा लागतो. त्यामुळे असा अपघात झाल्यास काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.
दुर्घटना स्थळावरून पळू नका: तुमच्या गाडीमुळे एखाद्या ठिकाणी अपघात झाला असेल तर पळून जाऊ नका. आपलं वाहनं जागीच थांबवा. अपघातात एखादी व्यक्ती जखमी, मृत्यू झाली असेल तरी गाडी घटनास्थळी जागेवर थांबवा. दुर्घटना स्थळावरून पळ काढल्यास कारवाईसोबत मोठा दंड भरावा लागेल. त्याऐवजी घटनास्थळी जखमी किंवा मृत व्यक्तीला मदत करा.
पोलिसांना फोन करा: अनेकदा अपघात झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की, पोलिसांना कळवलं जातं. पण एखादी व्यक्ती जखमी किंवा गाडीचं नुकसान झालं तरी पोलिसांना माहिती देणं आवश्यक आहे. कारण वीम्याची रक्कम मिळण्यासाठी एफआयर कॉपी मागितली जाते. एफआयरमध्ये कॉन्टॅक्ट डिटेल्स, साक्षीदारांचे नाव आणि दुर्घटनेची माहिती असते.
भांडू नका: अनेकदा अपघातात गाडीचं नुकसान झालं की 'तू तू मै मै' होते. तुम्हीही गाडीला साधं क्रॅश गेलं की भांडता. पण तसं करून भांडण करण्याऐवजी गाडीचं किती नुकसान झालं आहे याचा आढावा घ्या. तसेच समोरच्या व्यक्तीसोबत प्रेमाने बोला आणि खर्चाबाबत माहिती घेऊन पैसे द्या.
घटनास्थळाची पूर्ण माहिती घ्या: घटनास्थळावरून निघताना त्या ठिकाणची पूर्ण माहिती घ्या. शक्य झाल्यास घटनास्थळाचे फोटो आणि व्हिडीओ रेकॉर्ड करा. या व्यतिरिक्त अपघातग्रस्त लोकांचे नाव आणि संपर्क क्रमांक लिहून घ्या. घटनेची वेळ आणि तारीखही नमूद करा.
चूक नसेल तर..: अपघातात तुमची चूक नसेल तर लेखी माफी मागू नका. विमा कंपनीशी वाटाघाटी करताना देखील आपली चूक नसेल तर चूक झाली असं सांगू नका. घटनास्थळाची खरी माहिती द्या. जर तुम्ही थर्ड पार्टीची माफी मागितली तर वीमा कंपनीला फायदा होईल. वीमा कंपनी तुम्हाला क्लेम अमाउंट देणार नाही.