गुगलवर चुकूनही शोधू नका या ५ गोष्टी, कारण वाचून व्हाल हैराण
गुगलचा वापर लोक सर्वात जास्त हा सर्चसाठी घेतात. लोकांना इतका विश्वास आहे जे कुठेही नाही मिळणार ते गुगलवर मिळणार. पण काय तुम्ही गुगलवर सर्च करताना कधी विचार करता, आपण काय सर्च करतो आहोत?
नवी दिल्ली : गुगलचा वापर लोक सर्वात जास्त हा सर्चसाठी घेतात. लोकांना इतका विश्वास आहे जे कुठेही नाही मिळणार ते गुगलवर मिळणार. पण काय तुम्ही गुगलवर सर्च करताना कधी विचार करता, आपण काय सर्च करतो आहोत?
गुगलवर सर्च करण्याआधी जाणून घ्या काय सर्च करावे आणि काय नाही. आम्ही अशा पाच गोष्टी सांगणार आहोत ज्या चुकूनही गुगलवर सर्च करू नये.
* ओळख : गुगलवर सर्चचा वापर चुकूनही कधी आपली ओळख सर्च करण्यासाठी करू नये. कारण गुगलकडे तुमची सगळी सर्च हिस्ट्रीचा डेटाबेस असतो. आणि पुन्हा पुन्हा ते सर्च केल्याने हा डेटा लीक होण्याचा धोका होतो. हॅकर्स यावरच लक्ष ठेवून असतात की, त्यांना सहज कोणती माहिती हॅक करता येईल.
* अनोळखी वस्तू : अनेकदा गुगलवर लोक अशा काही गोष्टी सर्च करतात, ज्यांचा काहीच अर्थ नसतो. पण तरीही केवळ बघण्यासाठी त्या सर्च केल्या जातात. अशा गोष्टी अजिबात सर्च करू नका. कारण सायबर सेलची नजर नेहमीच अशा लोकांवर असते. अशात तुमची अडचण वाढू शकते.
* ई-मेल : पर्सनल ई-मेल लॉगिन गुगलवर सर्च करणेही थांबवा. असे केल्याने तुमचं अकाऊंट हॅक आणि पासवर्ड लीक होऊ शकतो. एका अभ्यासानुसार, जगभरात सर्वात जास्त हॅकिंग ही ई-मेलची होते. याबाबत सायबर सेलकडे सर्वात जास्त तक्रारी येतात.
* मेडिसिन : जर तुम्ही आजारी आहात आणि मेडिसिनबाबत गुगलवर सर्च करताय तर त्वरीत असे करणे टाळावे. कारण सर्च डेटा थर्ड पार्टीला ट्रान्सफर केला जातो. त्यामुळे तुम्हाला सतत त्याचा आजाराबाबत आणि त्यावरील उपायासंबंधी जाहीराती दाखवल्या जातात.
* जाहीराती : गुगलवर कधीही असुरक्षीत माहिती सर्च करू नका. जर तुम्ही असे कराल तर तुम्हाला त्यासंबंधी जाहीराती दिसू लागतात. त्यामुळे हे जाणून घेऊ शकता की, तुम्हाला इंटरनेटवर कोण फॉलो करत आहे.