आता तुमची नखचं बनणार तुमचा पेमेंट कार्ड, नखांद्वारे करता येणार माहिती शेअर, कसे ते जाणून घ्या
नखं तर आपल्या शरीराचा एक भाग आहे. मग हे कसे काय शक्य होऊ शकते?
मुंबई : तुमच्याकडे पैसे नसल्यास किंवा तुम्ही तुमचे एटीएम कार्ड विसरले असल्या, तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही. कारण आता तुम्हाला तुमच्या नखातून पैसे देता येणार आहे. हो बरोबर वाचलात तुम्ही. आता तुम्हाला तुमच्या फक्त नखातून पैशांना देता येणे शक्य होणार आहे. पण तुम्ही म्हणाल आता हे कसे शक्य आहे? नखं तर आपल्या शरीराचा एक भाग आहे. मग हे कसे काय शक्य होऊ शकते? तर तुम्हाला त्यासाठी अशी नख विकत घ्यावी लागतील.
दुबईतील एक ब्युटी सलून लोकांच्या नखांमध्ये हे मायक्रोचिपिंग लावून देत आहे. जे मायक्रोचिपिंग आपल्याला डिजिटल कार्ड, शॉपींग कार्ड आणि इन्स्टाग्रामवर माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी तुम्हा वापरु शकता.
नखेवरील मायक्रोचिप नियर फील्ड कम्युनिकेशनवर कार्य करते. सलूनचे मॅनेजर नूर म्हणाले की, मुळात यासाठी आमच्यासमोर मोठे आव्हान होते की, नखात बसण्याइतके लहान ती चीप कशी तयार करावी." यावर कोरोना काळात जेव्हा सगळे लोकं घरी होते तेव्हा तिने यासगळ्यावर खूप अभ्यास आणि रिसर्च केला.
त्याने सांगितले की, आतापर्यंत त्यांनी 500 हून अधिक मायक्रोचिप मॅनिक्युअर केले आहेत. म्हणजेच 500 पेक्षाजास्त लोकांनी या चिपला नखांमध्ये बसवून घेतलं आहे.
भविष्यकाळात नेल मायक्रोचिपचा वेटर लोकांमध्ये कॉन्टॅक्टलेस पेमेंटसाठी वापरता येऊ शकतो. मायक्रोचिप्स अँड्रॉइड आणि आयओएस सॉफ्टवेअरसह वापरता येऊ शकतात.
या नेल सर्वीसची सुरवात जेल पॉलिशने होते, त्यानंतर त्यात चिप लोड केली जाते आणि नखे टिकाऊ पॉलिशच्या दुसऱ्या थराने झाकली असतात. ब्यूटी लाऊंजचे ओनर नूर मकारेम यांच्या मते, चिप्समध्ये अशी माहिती असू शकते जी डिजिटल व्यवसाय कार्ड म्हणून वापरली जाऊ शकते.
"आम्ही यामध्ये तुमचे नाव, तुमचा मोबाइल नंबर, तुमचा सोशल मीडिया अकाउंट यासारखी माहिती त्या चिपमध्ये स्थापित करतो. आपण सहजपणे ही माहिती कोणाशीही शेअर करू शकता."