नवी दिल्ली : स्मार्टफोन्समध्ये व्हायरसचा धोका नेहमीच सतावत असतो. कुठल्याही थर्ड पार्टीवरुन अॅप डाऊनलोड केल्यास फोनमध्ये व्हायरस येण्याची दाट शक्यता असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या त्रासापासून वाचण्यासाठी तुम्हाला फोनमध्ये केवळ एक सिक्रेट सेटिंग करण्याची आवश्यकता असते. ही सेटिंग केल्यास फोनमध्ये वायरस हल्ला होण्याची शक्यता निघून जाते. ही ट्रिक अँड्रॉईड मार्शमेलो आणि नॉगट वर्जनवरही काम करते.


चला तर मग जाणून घेऊयात काय आहे ही खास सेटिंग


- सर्वात आधी तुम्हाला फोनच्या सेटिंगमध्ये जावं लागेल.


- त्यानंतर गुगलवर क्लिक करा, तेथे तुम्हाला सिक्युरिटीचं ऑप्शन मिळेल.


- अनेक फोन्समध्ये गुगलचा पर्याय सेटिंगच्या बाहेरच असतो. तर अनेक फोन्समध्ये हा पर्याय अकाऊंट्समध्ये दिला जातो.


- सिक्युरिटीवर टॅप केल्यानंतर गुगल प्ले प्रोटेक्टवर क्लिक करत खालीदिलेले दोन्ही ऑप्शन्स इनेबल करा.


- त्यानंतर तुम्ही जेव्हाही एखादं अॅप इंस्टॉल कराल त्यावेळी गुगल त्याला ऑटोमेटिकली स्कॅन करेल. जर त्यामध्ये व्हायरल असेल तर गुगल तुम्हाला पॉपअप देईल. त्यासोबतच अॅप इंस्टॉल करण्यापासून थांबेल.


असं होतं प्रोटेक्ट


गुगल आपल्या प्ले स्टोरवर असलेल्या प्रत्येक अॅपची प्रायव्हेसी आणि सिक्युरिटीची तपासणी करतं. त्यासाठी एक कॅटेगरी peer ग्रुप बनवतं. त्यामुळे एखादं अॅप युजरकडून कुठलीही परवानगी मागतं त्यावेळी गुगल त्याला फ्लॅग देतं.