Donald Trump is back on Twitter : Twitter ने मोठा निर्णय घेत अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे ट्विटर अकाउंट (Twitter account) रिस्टोअर करण्यात आले आहे. ट्विटरचे नवे बॉस एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या घोषणेनंतर ट्रम्प 22 महिन्यांनंतर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पुन्हा परतले आहेत. काही दिवसांपूर्वी एलॉन मस्क यांनी ट्विटरवर एका पोलद्वारे लोकांना विचारले होते की डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट रिस्टोअर करावे का? यानंतर मस्क यांनी ट्विट करून माहिती दिली की, लोकांच्या इच्छेनुसार, ट्रम्प यांचे ट्विटर खाते पुन्हा सुरु करण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोनाल्ड ट्रम्प  (Donald Trump) यांनी रिपब्लिकन ज्यू कोलिशनच्या वार्षिक नेतृत्व बैठकीत एका पॅनेलने ट्विटरवर परतण्याबाबत विचारले असता, माजी अध्यक्ष म्हणाले, 'मला परत येण्याचे कोणतेही कारण दिसत नाही.' ट्विटरचे नवीन मालक एलॉन मस्क यांनी त्याची जबाबदारी स्वीकारताच, या प्लॅटफॉर्मवर अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे खाते रिस्टोअर  करण्याबद्दल चर्चा सुरु झाली. त्यासाठी त्यांनी शनिवारपासून मतदानालाही सुरुवात केली. रविवारी मतदान संपल्यानंतर ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट पुन्हा सक्रीय करण्यात आले आहे. मात्र बहुमतानंतरही आता ट्विटरवर परतण्यात रस नसल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी स्पष्ट केले. (अधिक वाचा : Heart Attack : हृदयविकाराचा झटका येण्याच्या 4 आठवडे आधी मिळतात हे संकेत, या 10 गोष्टींकडे करु नका दुर्लक्ष)


ट्विटर पेक्षा हे अ‍ॅप अधिक चांगले...


रिपब्लिकन ज्यू कोलिशनच्या वार्षिक नेतृत्व बैठकीत एका पॅनेलने ट्विटरवर परतण्याबद्दल विचारले असता, डोनाल्ड ट्रम्प  (Donald Trump) म्हणाले,  मला परत येण्याचे कोणतेही कारण दिसत नाही. ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुप (टीएमटीजी) स्टार्टअपने विकसित केलेल्या 'ट्रुथ सोशल' अ‍ॅपला ते जोडलेले राहतील. ज्यात ट्विटरपेक्षा यूजर्सशी त्यांचे चांगले संबंध आहेत आणि ते चांगले काम करत आहेत. ट्रम्प यांच्या या प्रतिक्रियेवर ट्विटरकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.


ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट गेल्या वर्षी सस्पेंड  


अमेकिकेतील निवडणूक निकालानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कॅपिटल हिलमध्ये दंगल भडकवल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांनंतरच ट्विटरने जानेवारी 2021 मध्ये ट्रम्प यांचे खाते निलंबित केले होते. आता, खाते सक्रिय करण्यासाठी एलॉन मस्क यांनी मतदान सुरु होण्याच्या 40 मिनिटांपेक्षा कमी आधी, सुमारे 14.8 दशलक्ष ट्विटर यूजर्सनी म्हणजेच 51.8 टक्के लोकांनी ट्रम्पचे खाते पुन्हा सक्रिय करण्याच्या बाजूने मतदान केले. ट्रम्प यांनी मंगळवारी 2024 मध्ये व्हाईट हाऊसच्या शर्यतीत पुन्हा प्रवेश करण्याची घोषणा केली. (अधिक वाचा : Winter health tips: 99 टक्के लोकांना माहित नाही थंडीत किती वाजेपर्यंत ऊन घ्यावे, केव्हा मिळते व्हिटॅमिन D?)


ट्रुथ सोशलवर ट्रम्प यांचे सुमारे 4.57 दशलक्ष फॉलोअर्स 


ट्विटरवर त्यांचे खाते निलंबित झाल्यानंतर ट्रम्प यांनी फेब्रुवारीमध्ये स्वतःचे व्यासपीठ सुरु केले. त्याला ट्रुथ सोशल असे नाव दिले. ट्रुथ सोशलवर ट्रम्प यांचे सुमारे  4.57  दशलक्ष फॉलोअर्स आहेत. ट्रुथ सोशलवर ट्रम्प सतत सक्रिय असतात. हे अ‍ॅप पूर्वी अ‍ॅप स्टोअरवर होते, हळूहळू ते या वर्षी ऑक्टोबरमध्ये Google Play Store वर देखील सूचीबद्ध झालेय.